विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर!

On: May 16, 2025 11:09 AM
Nanded Airport Flights
---Advertisement---

Air Travel Fare Hike | आता विमान प्रवास करणे अधिक महाग होणार आहे, कारण विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने प्रवासी सुविधा शुल्क (युझर डेव्हलपमेंट फी) लागू करण्यास मंजुरी दिली आहे. ही दरवाढ १६ मे २०२५ पासून लागू होणार असून, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाच्या तिकिटांवर याचा परिणाम होणार आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे वाढलेले शुल्क ३१ मार्च २०२९ पर्यंत लागू राहील. त्यामुळे यापुढे विमान तिकीट बुक करताना प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी ६१५ रुपयांचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार :

विमान प्रवासाच्या दरात होणारी ही वाढ फार मोठी नसली तरी, करांसारख्या इतर शुल्कामुळे अंतिम तिकीट जास्त किमतीचे दिसणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. या दरवाढीनंतर देशांतर्गत प्रवासासाठी १७५ रुपये आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी ६१५ रुपयांचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.

ही वाढलेली रक्कम विमान तिकिटातच समाविष्ट केली जाईल. विशेष म्हणजे, ऑगस्ट २०२४ पर्यंत देशांतर्गत प्रवासासाठी हे शुल्क १२० रुपये होते आणि सध्या ही फी फक्त आंतरराष्ट्रीय प्रवाशांनाच लागू होती.

Air Travel Fare Hike | मुंबई विमानतळावर हा नियम सर्व विमान प्रवाशांसाठी लागू :

आता मुंबई विमानतळावर येणाऱ्या देशांतर्गत प्रवाशांना या नियमानुसार ७५ रुपये शुल्क भरावे लागेल, तर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना २६० रुपये शुल्क भरावे लागेल. या शुल्कवाढीमुळे देशांतर्गत तिकिटांसाठी २५० रुपये आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी ८७५ रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.

सर्वसाधारणपणे, हे शुल्क विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटांवर आकारले जाते. आता मात्र मुंबई विमानतळावर हा नियम सर्व विमान प्रवाशांसाठी लागू असेल, ज्यामुळे विमान प्रवासाच्या खर्चात वाढ होणार आहे.

News Title: News Affecting Air Travelers’ Pockets; From Now On While Booking Tickets…

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now