Shubham Dwivedi Kashmir Death l जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (pahalgam attack) येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात कानपूरचे व्यापारी आणि नवविवाहित शुभम द्विवेदी (shubham dwivedi) यांचा निर्दयतेने बळी गेला. केवळ दोन महिन्यांपूर्वी विवाहबद्ध झालेला शुभम आपल्या पत्नी एशान्या आणि कुटुंबीयांसोबत काश्मीरमध्ये सहलीसाठी गेला होता. मात्र, एका अकल्पित घटनेने त्यांच्या आयुष्याचा शेवट झाला आणि त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. (Shubham Dwivedi Kashmir Death)
बैसरन परिसरात घोडेस्वारी करताना शुभम आणि एशान्या अतिरेक्यांच्या निशाण्यावर आले. सैनिकी पोशाखात असलेल्या अतिरेक्यांनी शुभमला थांबवून त्याचा धर्म विचारला. त्यानंतर त्याला कुराणातील ‘कलमा’ वाचायला सांगितले. कलमा न येत असल्याचं सांगताच अतिरेक्यांनी त्याच्यावर गोळी झाडली. ही अमानुष घटना एशान्या समोरच घडली. ती हंबरडा फोडून म्हणाली, “मलाही मारून टाका.” त्यावर अतिरेक्यांनी उत्तर दिलं, “तुला जिवंत सोडतोय, जेणेकरून तू सरकारला आमचं काय केलं ते सांगू शकशील.”
नवविवाहित जोडप्याचं हनीमूनचं स्वप्न रक्ताच्या थारोळ्यात संपलं :
शुभम द्विवेदी (वय ३१) आणि एशान्या यांचं फेब्रुवारी १२ रोजी लग्न झालं होतं. ही त्यांच्या विवाहानंतरची दुसरी सहल होती. पहलगामजवळच्या ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली. अतिरेक्यांनी टेकडीवरून खाली येत पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. अरुंद रस्ता आणि गोंधळामुळे अनेकजण अडकले. काहींनी पळून जीव वाचवला, तर काहींना संधीही मिळाली नाही. (Shubham Dwivedi Kashmir Death)
या हल्ल्यात एकूण २६ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात महाराष्ट्रातील डोंबिवली व पनवेलमधीलही काही नागरिकांचा समावेश आहे. घटनास्थळी असलेल्या स्थानिकांनी अनेक जखमी पर्यटकांना पाठीवरून रुग्णालयात पोहचवलं.
Shubham Dwivedi Kashmir Death l देशभरात संतापाची लाट; सरकारकडून निषेध :
या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संताप उसळला आहे. अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाली असल्याचा सरकारचा दावा वारंवार करण्यात येत होता. यंदा काश्मीरमध्ये देशी-विदेशी पर्यटकांची वाढती संख्या याच शांततेचं प्रतीक मानली जात होती. मात्र, या नियोजित हल्ल्याने पुन्हा एकदा दहशतीचं सावट गडद केलं आहे. (Shubham Dwivedi Kashmir Death)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra modi) या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. शुभमच्या कुटुंबीयांनी सरकारकडे लवकरात लवकर मृतदेह त्यांच्या मूळगावी पाठवण्याची मागणी केली आहे.






