चीनमधून पुन्हा धोका?; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

On: February 22, 2025 12:54 PM
New China Virus Threat Concerns Rise
---Advertisement---

China Virus | कोरोना महामारीनंतर आता चीनमधून (China Virus) आणखी एका नवीन व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे, ज्यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. हा नवीन व्हायरस प्राण्यांमधून मानवांमध्ये पसरत असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, हा व्हायरस चीनमधील (China) वुहान (Wuhan) प्रयोगशाळेत सापडला आहे.

वुहान लॅबमध्ये नवीन व्हायरसचा शोध

कोरोना महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले होते अशात पुन्हा एकदा चीनमधून (China) नवीन व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे. ब्लूमबर्गच्या (Bloomberg) अहवालानुसार, वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या (Wuhan Institute of Virology) एका संशोधकाने हा नवीन व्हायरस शोधला आहे. हा व्हायरस मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे, ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संशोधकांच्या दाव्यानुसार, हा नवीन व्हायरस कोरोनाप्रमाणेच मानवी पेशींमध्ये प्रवेश करतो. हा व्हायरस मानव आणि सस्तन प्राण्यांच्या प्रथिनांच्या माध्यमातून पेशींमध्ये प्रवेश करतो आणि त्यांचे नुकसान करतो. या नवीन व्हायरसला मीडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (MERS) असे नाव देण्यात आले आहे.

MERS व्हायरसची लागण आणि मृत्यू

ब्लूमबर्गच्या (Bloomberg) अहवालात नमूद केल्याप्रमाणे, 2012 ते मे 2024 दरम्यान सुमारे 2600 लोकांना MERS व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. यापैकी 36 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization) माहितीनुसार, या व्हायरसची सर्वाधिक प्रकरणे सौदी अरेबियामध्ये (Saudi Arabia) आढळली आहेत. वुहान (Wuhan) व्हायरस रिसर्च सेंटर वटवाघळांमध्ये आढळलेल्या कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) चर्चेत आले होते.

कोरोनाचा (Corona) भूतकाळ आणि चीनवरील (China) आरोप

कोरोना व्हायरस वुहान (Wuhan) प्रयोगशाळेतूनच पसरल्याचा आरोप करण्यात आला होता. कोविड-19 (Covid-19) व्हायरसने संपूर्ण जगाला थांबवले होते. या महामारीमुळे भारतातील कामगार आणि मजुरांचे मोठे हाल झाले, ज्याची दखल संपूर्ण जगाने घेतली. यानंतर, चीनवर (China) मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. (China Virus)

जगभरात कोरोनामुळे (Corona) 1.5 कोटींहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. दक्षिण-पूर्व आशिया, युरोप आणि अमेरिकेमध्ये मृतांची संख्या सर्वाधिक होती. WHO च्या अहवालानुसार, भारतामध्ये कोविडमुळे (Covid) 47 लाख लोकांचा मृत्यू झाला, तर भारत सरकारच्या (Indian Government) आकडेवारीनुसार, जानेवारी 2020 ते डिसेंबर 2021 दरम्यान 4 लाख 80 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.

Title : New China Virus Threat Concerns Rise

 

Join WhatsApp Group

Join Now