देशातल्या ‘या’ एअरपोर्टवर मिळतायेत सर्वात स्वस्त खाद्यपदार्थ; किंमत वाचून आश्चर्य वाटेल

On: January 25, 2025 2:35 PM
Airport shut
---Advertisement---

Airport Food l विमानतळांवर मिळणारे खाद्यपदार्थ (Food Items) आणि पेये (Beverages) सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारी असतात, असा अनुभव अनेकांना येतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कोलकाता (Kolkata) येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘उडान प्रवासी कॅफे’ सुरु करण्यात आले आहे. या कॅफेमुळे सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला असून, अवघ्या दहा रुपयांत चहा आणि वीस रुपयांत सामोसा येथे उपलब्ध आहे.

एका खासगी कंपनीच्या पुढाकाराने सुरु झालेले हे कॅफे, देशातील अशा प्रकारचे पहिलेच स्वस्त भोजन देणारे आउटलेट (Outlet) ठरले आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या सहकार्याने सुरु झालेल्या या उपक्रमाला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

प्रवाशांच्या तक्रारींची दखल :

विमानतळांवर मिळणारे खाद्यपदार्थ आणि पेये रेल्वे स्थानकांच्या (Railway Stations) तुलनेत १००-२०० टक्क्यांनी महाग असल्याचे एका सर्वेक्षणात (Survey) समोर आले होते.

या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६० टक्के प्रवाशांनी ही बाब मान्य केली होती. प्रवाशांच्या या तक्रारींची दखल घेत ‘उडान प्रवासी कॅफे’ सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Airport Food l स्वस्त दरात दर्जेदार सेवा :

‘उडान प्रवासी कॅफे’मध्ये अवघ्या दहा रुपयांत पाणी आणि चहा मिळतो. सामोसा, कॉफी आणि मिठाईसाठी प्रवाशांना फक्त वीस रुपये मोजावे लागतात. शहरातील मॉल (Malls) आणि इतर ठिकाणांपेक्षाही हे दर स्वस्त असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात २८,००० प्रवाशांनी सहभाग घेतला होता. यातील ४३ टक्के प्रवासी टियर-१ शहरातील, ३० टक्के टियर-२ शहरातील तर २७ टक्के प्रवासी टियर-३, ४, ५ शहरे आणि ग्रामीण भागांतील होते. विमानतळांवर मिळणारे सामोसा, पॅटिस, चहा-कॉफी २०० ते ३०० रुपयांना मिळत असल्याचा अनुभव प्रवाशांनी या सर्वेक्षणात सांगितला होता.

News title : Netaji Subhash Chandra Bose International Airport has the cheapest food in the country

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now