Nagpur News | नागपूरमधून (Nagpur News) एक अतिशय भयंकर आणि विकृत घटना समोर आली आहे. एका नराधमाने शाळेजवळ असलेल्या दुकानाचे शटर दुरुस्त करण्याच्या बहाण्याने तब्बल 17 शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नंदनवन पोलिसांनी (Nandanvan Police) गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. रवी लाखे (वय 32) असे या नराधम आरोपीचे नाव आहे.
शटर दुरुस्तीच्या बहाण्याने गैरवर्तन:
काही दिवसांपूर्वीच नागपूरमध्ये एका समुपदेशकाने (Counselor) शेकडो मुली, तरुणी आणि महिलांचे लैंगिक शोषण (Sexual Exploitation) केल्याची घटना उघडकीस आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच, आता या दुसऱ्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नागपुरातील नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. परिसरातील एका नामांकित शाळेच्या बाजूला असलेल्या स्टेशनरी दुकानाचे (Stationery Shop) शटर नादुरुस्त झाले होते. दुकानमालकाने आरोपी रवी लाखे याला दुरुस्तीसाठी बोलावले होते. शनिवारी दुपारी तो दुकानाचे काम करण्यासाठी आला. मात्र, त्याची विकृत मानसिकता पाहून त्याने काम सोडून शाळेच्या गेटजवळ उभे राहून येणाऱ्या-जाणाऱ्या मुलींकडे वाईट नजरेने पाहिले.
एका पालकाने त्याला हटकल्यानंतर तो दुकानात परतला. स्टेशनरी दुकान उघडे पाहून काही मुली दुकानात आल्या आणि त्यांनी काही वस्तू मागितल्या. दुकानाचा मालक तिथे नसल्याची संधी साधून आरोपीने त्या मुलींना आत बोलावले आणि त्यांच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. तो त्यांना नको त्या ठिकाणी स्पर्श करून अश्लील चाळे करू लागला. (Nagpur News)
काही मुलींनी घाबरून तेथून पळ काढला. जवळपास दोन तासांत 17 मुली त्या दुकानात आल्या आणि आरोपीने त्यांना बिस्किट-चॉकलेटचे आमिष दाखवून आत बोलावले आणि त्यांच्यासोबत गैरवर्तन केले.
पालकांमध्ये संताप
या घटनेमुळे परिसरात आणि पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
Title : Nagpur News Man Molests 17 School Girls on Pretext of Repairing Shop Shutter






