शारीरिक संबंधादरम्यान शेजारच्याची गळा आवळून हत्या, कारण ऐकून धक्का बसेल

On: February 3, 2025 1:49 PM
Murder Case Woman Murders Lover in UP Bareilly Fed Up of Blackmail
---Advertisement---

Murder Case | शारीरिक संबंधादरम्यान (Physical Relationship) एका महिलेने 32 वर्षीय पुरुषाचा गळा आवळून हत्या (Murder) केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. 30 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बरेली (Bareilly) जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी (Police) महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून तिला अटक (Arrest) करण्यात आली आहे. (Murder Case)

ब्लॅकमेलिंगला कंटाळून हत्या

इक्बाल (Iqbal) असे मृत (Dead) पुरुषाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून तो महिलेला एका कॉल रेकॉर्डिंगवरून (Call Recording) ब्लॅकमेल करत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून आपण त्याची हत्या केल्याची कबुली (Confession) आरोपी महिलेने पोलिसांसमोर दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत इक्बाल आणि आरोपी महिला शेजारी (Neighbours) राहणारे होते. काही दिवसांपासून इक्बाल एका कॉल रेकॉर्डिंगचा वापर करून महिलेला ब्लॅकमेल करत होता. त्याने यापूर्वी आरोपी महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्याच्या या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने त्याची हत्या करण्याची योजना आखली. 30 जानेवारी रोजी रात्री आरोपी महिलेने इक्बालला तिच्या घरी बोलावले. तसेच त्याला बेशुद्धीच्या गोळ्या (Sedative Pills) देऊन स्वतःच्या पतीच्या चहात मिसळायला सांगितले. त्यामुळे तिचा पती बेशुद्ध झाला. त्यानंतर पती शुद्धीत नसल्याची खात्री करून घेत, दोघेही रात्री 12 वाजताच्या सुमारास इक्बालच्या घरी गेले. यावेळी शारीरिक संबंधादरम्यान आरोपी महिलेने इक्बालचा गळा आवळून हत्या केली.

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

हत्या केल्यानंतर महिलेने इक्बालचा मृतदेह पायऱ्यांवरून खाली खेचत आणला आणि त्याच्या घरातून निघून गेली. सकाळी इक्बालच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून शेजाऱ्यांनी (Neighbours) आत डोकावून पाहिले असता, त्यांना इक्बाल मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. Murder Case

दरम्यान, या प्रकरणी इक्बालच्या पत्नीने 1 फेब्रुवारी रोजी आरोपी महिलेविरोधात तक्रार (Complaint) दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. सुरुवातीला तिने या हत्येत आपला सहभाग नसल्याचे सांगितले. मात्र, कसून चौकशीअंती तिने हत्येची कबुली दिली. ”इक्बाल एका कॉल रेकॉर्डिंगचा वापर करून मला ब्लॅकमेल करत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून मी त्याची हत्या केली”, असे तिने पोलिसांना सांगितले.

सदर महिलेने ब्लॅकमेलिंगला कंटाळून टोकाचे पाऊल उचलत इक्बालची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

Title : Murder Case Woman Murders Lover in UP Bareilly Fed Up of Blackmail

 

Join WhatsApp Group

Join Now