मृत्यूच्या दारात असलेल्या बायकोची शेवटची इच्छा ऐकून नवरा हादरला, म्हणाली ‘एक्ससोबत मला सेक्स…’

On: April 7, 2025 4:18 PM
Japan
---Advertisement---

Mumbai | आयुष्यात कधी कोणती वेळ येईल, हे सांगता येत नाही. सोशल मीडियावर (Social Media) सध्या अशाच एका जोडप्याची हृदयद्रावक कहाणी चर्चेत आहे, जिथे एका गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या पत्नीने आपल्या पतीकडे एक अशी शेवटची इच्छा व्यक्त केली आहे, जी ऐकून पती पूर्णपणे खचून गेला आहे आणि काय करावे या विचारात पडला आहे. त्याने आपली ही व्यथा रेडिट (Reddit) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मांडून लोकांचा सल्ला मागितला आहे.

पत्नीची शेवटची इच्छा

या व्यक्तीने रेडिटवरील आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, त्याच्या पत्नीला एक असाध्य आजार (Terminal Illness) झाला आहे आणि डॉक्टरांनी तिच्याकडे जगण्यासाठी जास्तीत जास्त नऊ महिन्यांचा अवधी असल्याचे सांगितले आहे. “हे ऐकून मी तिथेच संपलो,” असे म्हणत त्याने आपले दुःख व्यक्त केले. येत्या ४-५ महिन्यांत ती व्हीलचेअरवर जाईल आणि ८ महिन्यांत अंथरुणाला खिळेल (Bedridden), असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.

“आम्ही गेली अनेक वर्षे एकत्र सुखी संसार करतोय. मी तिच्याशिवाय जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. ती गेल्यावर मी काय करेल मला माहिती नाही,” अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या पत्नीचे आयुष्यातील शेवटचे दिवस चांगले जावेत, यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचेही त्याने म्हटले आहे.

एक्स बॉयफ्रेंडसोबत शारीरिक संबंध?

आपल्या पत्नीच्या शेवटच्या दिवसांमध्ये तिला अधिकाधिक आनंद देण्यासाठी आणि तिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने मोठ्या हिमतीने तिला तिची शेवटची इच्छा विचारली. “तुझी शेवटची इच्छा काय आहे?” या प्रश्नावर पत्नीने जे उत्तर दिले, ते ऐकून पतीला प्रचंड धक्का बसला (“मला धक्काच बसला”). पत्नीने सांगितले की, तिला तिच्या आयुष्यात शेवटच्या वेळी तिच्या एक्स प्रियकरासोबत (Ex-boyfriend) शारीरिक संबंध (Physical Relations) ठेवायचे आहेत.

या धक्कादायक इच्छेमागील कारण विचारल्यावर पत्नीने सांगितले की, तिचा माजी प्रियकर हा शारीरिक दृष्ट्या खूप सुसंगत (Physically Compatible) होता आणि त्याच्यासोबतचे शारीरिक संबंध हे तिच्यासाठी अत्यंत सुखद (Pleasant Experience) आणि भावनिकदृष्ट्याही चांगले (Emotionally Fulfilling) होते. पत्नीचे हे उत्तर ऐकून पती आणखीनच हलून गेला. त्याला हे सर्व मूर्खपणाचे (Foolishness) वाटत होते आणि आपली फसवणूक (Cheated) झाल्याची भावना त्याच्या मनात होती. आता तो मोठ्या द्विधा मनस्थितीत आहे. त्याने रेडिटवरील युझर्सना विचारले आहे की, “त्याने काय करायला हवं? माझ्या पुरुषी अहंकारामुळे (Male Ego) मी तिला नकार द्यावा की ती मरणार आहे म्हणून तिची शेवटची इच्छा पूर्ण करावी?” त्याला असेही वाटत आहे की, पत्नीने त्याला अशा स्थितीत आणून ठेवले आहे, जिथे तिच्या इच्छेला हो म्हणण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नाही, कारण ती काही दिवसात हे जग सोडून जाणार आहे.

Title : Terminally Ill Wife Last Wish Ex Boyfriend Reddit

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now