काय सांगता!, चक्क प्लॅस्टिकपासून बनवला रस्ता… महाराष्ट्रात झाली ही किमया

On: January 25, 2025 6:50 PM
Mumbai News Now Paves The Way With Plastic Roads
---Advertisement---

Mumbai News |  मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रातील रस्त्यांच्या बांधकामात आता प्लास्टिकचा (Plastic) वापर केला जाणार आहे. कांजूरमार्ग (Kanjurmarg) येथे प्रायोगिक तत्त्वावर आयआयटी-मुंबईच्या (IIT-Mumbai) सहकार्याने अँटनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेडने (एडब्लूएचसीएल) प्लास्टिकपासून रस्ता तयार केला आहे. या अनोख्या प्रयोगामुळे रस्त्यांसाठी लागणारा खर्च कमी होईल आणि प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्नही मार्गी लागेल. (Mumbai News)

मुंबईत जून २०१८ पासून प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर, मोठ्या प्रमाणात जप्त केलेले प्लास्टिक पालिकेच्या गोदामात पडून होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी, महापालिकेने कांजूरमार्ग येथे २७० मीटर लांबीचा प्रायोगिक तत्त्वावर रस्ता तयार केला आहे. आयआयटी-मुंबईच्या (IIT-Mumbai) सिव्हिल इंजिनीअरिंग विभागातील पर्यावरणीय भू-तंत्रज्ञान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. डी. एन. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबवण्यात आला आहे.

असा बनवला जातो प्लास्टिकचा रस्ता

या रस्त्याच्या बांधकामासाठी प्लास्टिकपासून डांबरसदृश्य ‘बिटुमेन’ (Bitumen) तयार करण्यात आले आहे. या ‘बिटुमेन’ मध्ये ६ टक्के वितळवलेले आणि तुकडे केलेले प्लास्टिक वापरण्यात आले आहे. हे प्लास्टिक कचऱ्यातून जमा करण्यात आले आहे. या पद्धतीमुळे पारंपरिक ‘बिटुमेन’ वर अवलंबित्व कमी करणे शक्य होणार आहे. (Mumbai News)

पुनर्वापर न करता येणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या या प्रकल्पामुळे सुटणार आहे. या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, यामुळे रस्ते बांधणीचा खर्च कमी होणार आहे. “कचरा व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांचा विकास यांची सांगड घालण्याच्या दृष्टिकोनातून कांजूरमार्ग येथे या रस्त्याची आखणी करण्यात आली,” असे डॉ. डी. एन. सिंह यांनी सांगितले.

बिटुमेन म्हणजे काय?

१. बिटुमेन हा कच्च्या तेलाच्या उर्ध्वपतनातून तयार होणारा डांबरसदृश्य काळा पदार्थ आहे.

२. त्याचा वापर रस्ते बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.

३. बायोबिटुमेन हा जैव-आधारित बंधक पदार्थ आहे.

या प्रकल्पाच्या यशस्वितेनंतर, मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इतर रस्त्यांच्या बांधकामात देखील प्लास्टिकचा वापर करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास, प्लास्टिक कचऱ्याची समस्या दूर करून पर्यावरण रक्षणासाठी (Environment Protection) एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. (Mumbai News)

Title: Mumbai News Now Paves The Way With Plastic Roads

 

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now