मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेचा आज मध्यरात्रीपासून इमर्जन्सी ब्लॉक; वेळापत्रक तपासूनच प्रवास करा

On: January 29, 2025 4:16 PM
Central Railway
---Advertisement---

Mumbai News | मुंबईकरांसाठी (Mumbaikars) लोकल ट्रेनबाबत (Local Train) महत्त्वाची बातमीसमोर आली आहे. मध्य रेल्वेवरील (Central Railway) कर्नाक ब्रिजच्या (Karnak Bridge) कामामुळे सीएसएमटी (CSMT) ते मस्जिद (Masjid) दरम्यान ब्लॉक (Block) घेण्याचे सत्र सुरूच आहे. या महिन्याच्या 25, 26 आणि 27 जानेवारीला मोठा ब्लॉक घेण्यात आला होता. परंतु, या कालावधीत या ब्रिजचे काम पूर्ण न झाल्याने आता पुन्हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 1, 2 आणि 3 फेब्रुवारीला मोठ्या ब्लॉकचे नियोजन करण्यात आले होते, आणि आता त्यात आणखी एका ब्लॉकची भर पडली आहे. आज, 29 जानेवारीच्या मध्यरात्री 12.30 ते 3.30 वाजेपर्यंत सीएसएमटी ते मस्जिद स्थानकांदरम्यान इमर्जन्सी ब्लॉक (Emergency Block) घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो, रेल्वेचे वेळापत्रक (Timetable) पाहूनच प्रवासाचे नियोजन करा. (Mumbai News)

जर तुम्ही लोकल ट्रेनच्या शेवटच्या लोकलने प्रवास करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 29 जानेवारीला सीएसएमटीहून सुटणारी शेवटची लोकल रात्री 12.24 ऐवजी 12.12 वाजता सुटणार आहे. मध्य रेल्वेने सीएसएमटी ते मस्जिद स्थानकादरम्यान कर्नाक ब्रिजच्या बांधकामासाठी 3 तासांचा आपत्कालीन ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या ब्लॉकदरम्यान आरओबीवरील गर्डर समायोजनाचे (Girder Adjustment) काम पूर्ण केले जाणार आहे.

सीएसएमटी ते मस्जिद स्थानकादरम्यान रात्री 12.30 ते पहाटे 3 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. या ब्लॉकदरम्यान मेन लाइनवरील (Main Line) भायखळा (Byculla) ते सीएसएमटी आणि हार्बर मार्गावरील (Harbour Line) वडाळा (Wadala) ते सीएसएमटी दरम्यान उपनगरीय सेवा (Suburban Services) उपलब्ध राहणार नाही. भायखळा, परळ (Parel), दादर (Dadar) आणि कुर्ला (Kurla) स्थानकांवर मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन सेवा थांबतील आणि सुटतील. हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन लोकल सेवा वडाळा रोड स्थानकापर्यंत धावतील.

मुख्य मार्गावरील शेवटची लोकल (Main Line Last Local)

स्लो डाऊन मार्गावरील (Slow Down Line) सीएसएमटी-कर्जतसाठी (CSMT-Karjat) शेवटची लोकल रात्री 12.12 वाजता सुटणार आहे.
स्लो अप मार्गावर (Slow Up Line) सीएसएमटीसाठी शेवटची लोकल डोंबिवलीहून (Dombivli) रात्री 10.48 वाजता सुटेल. (Mumbai News)

ब्लॉकनंतर पहिली लोकल (First Local After Block)

स्लो डाऊन मार्गावरील कर्जतसाठी पहिली लोकल सीएसएमटीहून पहाटे 4.47 वाजता सुटणार आहे.
स्लो अप मार्गावरील सीएसएमटीसाठी पहिली लोकल कल्याणहून (Kalyan) पहाटे 3.23 वाजता सुटेल.

हार्बर मार्गावरील शेवटची लोकल (Harbour Line Last Local)

डाऊन मार्गावरील सीएसएमटी-पनवेल (CSMT-Panvel) शेवटची लोकल रात्री 12.13 वाजता सुटेल.
अप मार्गावरील सीएसएमटीसाठी शेवटची लोकल पनवेलहून (Panvel) रात्री 10.46 वाजता सुटेल.

ब्लॉकनंतर पहिली लोकल (Harbour Line First Local After Block)

डाऊन मार्गावरील सीएसएमटी ते पनवेल ही पहिली लोकल पहाटे 4.52 वाजता सुटणार आहे. (Mumbai News)
अप मार्गावरील सीएसएमटीसाठी पहिली लोकल वांद्रे (Bandra) येथून पहाटे 4.17 वाजता सुटणार आहे.
त्यामुळे मुंबईकरांनी या बदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे आणि रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे. (Mumbai News)

Title : Mumbai News Local Train Central Railway Emergency Block Tonight CSMT Masjid Services Affected Check Timetable

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now