Mumbai News | गणेश भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातून (Siddhivinayak Temple) एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आता सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट न्यासाकडून ड्रेस कोडबाबत एक अधिकृत पत्र काढण्यात आले आहे.
मंदिरात येणाऱ्या भाविकांनी (Mumbai News) आता भारतीय पारंपरिक वेशात (Indian Traditional Attire), अंगभर कपडे घालून मंदिरात येणे आवश्यक असणार आहे. या कपड्यांमध्येच मंदिरात प्रवेश दिला जाईल, अन्यथा प्रवेश दिला जाणार नाही, असे न्यासाकडून सांगण्यात आले आहे.
पुढील आठवड्यापासून अंमलबजावणी-
सिद्धिविनायक मंदिरात (Mumbai News) पुढील आठवड्यापासून आचारसंहिता ड्रेस कोडवर ठेवली आहे. मंदिरात येणाऱ्या भक्तांनी शालिनता आणि मंदिराचे पावित्र्य जपणारा पेहराव करावा. बाप्पाच्या दर्शनासाठी येताना मंदिराचे पावित्र्य नष्ट होणार नाही अशा प्रकारचा पेहराव भाविकांचा असावा.
तोकड्या कपड्यांवर बंदी-
नेमका पेहराव कसा करावा यावर बंधन नाही, मात्र जो पेहराव कराल तो दुसऱ्याला संकोच वाटणारा नसावा. म्हणजेच समोरच्या लोकांना लाजवतील किंवा त्यांना संकोच वाटेल असे कपडे नसावेत. तसेच तोकड्या कपड्यांवर बंदी असणार आहे. महिला, पुरुषांनी (Men) शॉर्ट पँट घालू नये. अंगभर कपडे असलेला पेहराव करावा.
भाविकांच्या तक्रारींनंतर निर्णय-
काही भक्तांच्या तक्रारी, सूचना न्यासाकडे प्राप्त झाल्या होत्या. काही भाविकांचे पेहराव समोरच्याला संकोच वाटणारे असायचे, त्यामुळेच ड्रेस कोडबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या भक्ताचा पेहराव हा पावित्र्य जपणारा असावा, असे सांगण्यात आले आहे.
नागरिकांना संकोच वाटणार नाही असे कपडे भाविकांनी परिधान करावे, असे न्यासाने म्हटलंय. तसेच भारतीय पारंपारिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातले पाहिजेत अशीही सूचना देण्यात आली आहे. अशा भाविकांनाच सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार असल्याचं पत्र मंदिर न्यासाकडून प्रसिद्ध करण्यात आलंय.






