Mumbai News | मुंबईतील (Mumbai) पवई (Powai) परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका व्यावसायिकाला त्याच्याच मित्राने ब्लॅकमेल करून तब्बल 80 लाख रुपयांची खंडणी (Ransom) मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने व्यावसायिकाच्या पत्नीकडे शरीरसुखाची (Physical Relationship) मागणी करत अश्लील फोटो (Obscene Photos) व्हायरल करण्याची धमकी देखील दिली आहे. (Mumbai News)
मागील सहा महिन्यांपासून आरोपी हा व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीला त्रास देत होता. अखेर, त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित व्यावसायिकाने पोलिसांत धाव घेतली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध जीवे मारण्याची धमकी (Death Threat), खंडणी आणि ब्लॅकमेलिंग (Blackmailing) अशा विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
असा रचला होता कट
जॉन परेरा (John Perera) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. तो पीडित व्यावसायिकाचा मित्र असल्याचे समोर आले आहे. आरोपीकडे व्यावसायिकाचे काही अश्लील व्हिडीओ (Obscene Videos) होते, ज्यामध्ये व्यावसायिकाची पत्नी आणि त्यांच्या मैत्रिणींचे देखील काही आक्षेपार्ह फोटोज होते. हे फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने व्यावसायिकाकडे 80 लाख रुपयांची मागणी केली होती.
पैसे न दिल्यास सर्व खासगी फोटो व्यावसायिकाच्या नातेवाईकांच्या आणि ऑफिसच्या ग्रुपवर (Office Groups) व्हायरल करण्याची धमकी आरोपी देत होता. ऑगस्ट 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत आरोपीने व्हॉट्सअॅपवरून (Whatsapp) कॉल करून सातत्याने ब्लॅकमेल आणि धमकी दिली. (Mumbai News)
पोलिसांत धाव, तपासाला वेग
अखेर आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित व्यावसायिकाने पवई पोलीस ठाण्यात (Powai Police Station) फिर्याद दाखल केली. हा गुन्हा अंधेरी (Andheri) परिसरात घडल्याने पवई पोलिसांनी हे प्रकरण डी एन नगर पोलिसांकडे (D N Nagar Police) वर्ग केले आहे. पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नाही. (Mumbai News)
लवकरच आरोपीची चौकशी करून त्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास डी एन नगर पोलीस करत आहेत. तसेच, पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित काही पुरावेही डी एन नगर पोलिसांना सुपूर्द केले आहेत.
Title: Mumbai News Businessman Blackmailed By Friend Demanded Ransom and Physical Relationship






