Mumbai News | येत्या विकेंडला (Weekend) जर तुम्ही फिरायला जायचा विचार करत असाल, तर थोडं थांबा. कारण येत्या १५-१६ फेब्रुवारीला अटल सेतू (Atal Setu) बंद राहणार आहे. रविवारी अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवर (Atal Bihari Vajpayee Sewri-Nhava Sheva Atal Setu – MTHL) मॅरेथॉन शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. (Mumbai News )
१३ तासांसाठी वाहतूक बंद
मॅरेथॉन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी (Mumbai Traffic Police) अनेक महत्त्वाचे वाहतूक निर्बंध जाहीर केले आहेत. १६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२ ते दुपारी १ वाजेपर्यंत अटल सेतू पूल १३ तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. या काळात अटल सेतूवर कोणत्याही प्रकारचे वाहन (दुचाकी, चारचाकी आणि जड वाहन) जाऊ दिले जाणार नाही.
निर्बंधांनुसार, मॅरेथॉनसाठी आवश्यक असलेली वाहने वगळता सर्व वाहनांना अटल सेतूवर बंदी असेल. मुंबई (Mumbai), पुणे (Pune), उरण (Uran) आणि जेएनपीटी (JNPT) दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसणार आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त (वाहतूक) आणि नवी मुंबईचे अतिरिक्त प्रभारी पोलिस उपायुक्त, वाहतूक, विठ्ठल कुबडे (Vitthal Kubde) यांनी जारी केलेला आदेश, २७ सप्टेंबर १९९६ च्या महाराष्ट्र सरकारच्या अधिसूचनेनुसार मोटार वाहन कायदा, कलम ११५ आणि ११६ (१) (अ) (ब) अंतर्गत येतो. गर्दी टाळण्यासाठी १५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ ते १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेपर्यंत अटल सेतूवर वाहनांची वाहतूक प्रतिबंधित केली जाईल.
मॅरेथॉनचा मार्ग
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) द्वारे रविवार, १६ फेब्रुवारी रोजी आयोजित मॅरेथॉनमुळे नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी अटल सेतूवर (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) वाहतूक निर्बंध जाहीर केले आहेत. ही मॅरेथॉन पहाटे ४ ते दुपारी १२ वाजेपर्यंत मुंबई (सेवरी) ते चिर्ले (नवी मुंबई) [Chirle (Navi Mumbai)] मार्गावर चालेल.
पोलिस वाहने, अग्निशमन दल, रूग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन सेवा तसेच मॅरेथॉनमध्ये थेट सहभागी असलेल्या वाहनांना सूट देण्यात येईल. गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
पोलिसांनी वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. उरणहून येणाऱ्यांसाठी गव्हाण फाटा, उरण फाटा आणि वाशी मार्गे आणि पुणे-मुंबई वाहतुकीसाठी यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे (Yashwantrao Chavan Expressway), बेलापूर (Belapur) आणि वाशी मार्गे जावे. (Mumbai News )
कोकण आणि पनवेल (Panvel) येथून येणारी वाहने देखील उरण फाटा आणि वाशी मार्गे वळवण्यात येतील, असे वाहतूक विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
Title : Mumbai News Atal Setu to be Closed for 13 Hours on February 15-16






