ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 चा विस्तार होणार, आता ‘या’ भागापर्यंत धावणार मेट्रो

On: March 29, 2025 12:12 PM
Mumbai Metro 5 Ulhasnagar to Get Metro Connectivity
---Advertisement---

Mumbai Metro 5 | मुंबईकडे येणाऱ्या उल्हासनगरकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. लवकरच उल्हासनगरमध्ये मेट्रो धावणार असून यामुळे प्रवास सोयीस्कर होणार आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिकेचा विस्तार आता उल्हासनगरपर्यंत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Mumbai Metro 5)

खडकपाडा ते उल्हासनगर मेट्रो प्रवास होणार जलद  

उल्हासनगरसारख्या ठिकाणाहून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना सध्या मुख्यत्वे लोकल ट्रेन हाच पर्याय आहे. परंतु लोकलची प्रचंड गर्दी आणि रस्त्यावरील वाहतूककोंडी यामुळे प्रवास त्रासदायक होतो. आता मात्र ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्ग (Metro Line 5) थेट उल्हासनगरपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

2024-25 च्या अर्थसंकल्पात मेट्रो मार्गिकेच्या कल्याण-खडकपाडा आणि खडकपाडा-उल्हासनगर या 7.7 किमीच्या विस्तारासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. या विस्तारीत मार्गामुळे नागरिकांना जलद, सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची नवी सुविधा उपलब्ध होणार आहे.

सुरुवातीच्या आराखड्यानुसार 24.9 किमी लांबीच्या या मेट्रो मार्गावर 17 स्थानके असणार होती. ही मेट्रो ठाण्यापासून सुरू होऊन कल्याणपर्यंतच मर्यादित होती. मात्र आता हा प्रवास थेट उल्हासनगरपर्यंत पोहोचणार आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी एकूण 8,416 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, पहिल्या टप्प्यात ठाणे ते भिवंडी मार्गाचे काम सुरू होणार आहे. या टप्प्यासाठी 1,579.99 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

MMRDAच्या अर्थसंकल्पात पायाभूत प्रकल्पांना भरघोस निधी

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (MMRDA) 2025-26 साठीचा 40,187.41 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सादर केला. यामध्ये 87% म्हणजे 35,151.14 कोटी रुपये पायाभूत प्रकल्पांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

या निधीतून मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण, नवे बोगदे, सागरी मार्ग, जलस्रोत विकास आणि नागरी सेवा सुविधा यांसाठी गुंतवणूक केली जाणार आहे. या उपक्रमामुळे मुंबई महानगर प्रदेशात एकात्मिक आणि गतिमान विकास होणार असून वाहतूक कोंडी, प्रवासाचा कालावधी आणि इंधन खर्च यामध्ये मोठी बचत होणार आहे.

Title : Mumbai Metro 5 Ulhasnagar to Get Metro Connectivity Soon

 

Join WhatsApp Group

Join Now