मुंबई लोकल प्रवाशांनो लक्ष द्या! रविवारी CSMT ते ‘या’ मार्गावर राहणार मेगाब्लॉक

On: April 18, 2025 8:48 AM
Diwali Special Train
---Advertisement---

Mumbai Local | रविवार, 20 एप्रिल 2025 रोजी मुंबईतील लोकल प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मध्य रेल्वे (Central Railway) आणि हार्बर मार्गावर नियोजित मेगाब्लॉकमुळे अनेक सेवा तात्पुरत्या स्वरूपात रद्द होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी वेळेत माहिती घेऊन प्रवासाचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. (Mumbai Local)

मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक 

मध्य रेल्वेने रविवारी सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या लोकल मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या कालावधीत सीएसएमटीवरून सकाळी 10:48 ते दुपारी 3:45 या वेळात निघणाऱ्या डाऊन धीम्या लोकल गाड्यांना डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे.

यामुळे  मस्जिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोड या स्थानकांवरून लोकल सेवा थांबवण्यात येणार आहे. त्यामुळे या स्थानकांवर प्रवास करणाऱ्यांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून या ब्लॉकदरम्यानच्या बदलांची वेळेवर घोषणा करण्यात आली असून, या काळात प्रवास करणाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हार्बर मार्गावरही ब्लॉकचा फटका

त्याच दिवशी हार्बर मार्गावर देखील महत्त्वपूर्ण ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे ते वाशी / नेरूळ / पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन सेवा सकाळी 11:10 पासून संध्याकाळी 4:10 पर्यंत बंद राहतील. (Mumbai Local)

या वेळात ठाणे ते वाशी, नेरूळ आणि पनवेलदरम्यान धावणाऱ्या ट्रान्स हार्बर मार्गावरील सर्व लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांनी पूर्वीपासूनच योजना आखून पर्यायी मार्गांचा विचार करावा. ही बंदी देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे अत्यावश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Title : Mumbai Local Mega Block in This Sunday

 

Join WhatsApp Group

Join Now