18 तासांचा प्रवास अवघ्या 7 तासांत! महाराष्ट्रातील ‘या’ 3 जिल्ह्यांतून जाणार 14 पदरी महामार्ग, 10 नद्यांवर उभारणार…

On: May 5, 2025 8:25 AM
Mumbai Bengaluru Expressway update 
---Advertisement---

Mumbai Bengaluru Expressway | देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि आयटी हब बंगळुरु यांना जोडणारा नवीन १४ पदरी द्रुतगती महामार्ग लवकरच उभारला जाणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणावर कमी होणार असून व्यापारी, लॉजिस्टिक व पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. (Mumbai Bengaluru Expressway)

मुंबई-बंगळुरु महामार्ग 

मुंबईपासून बंगळुरूपर्यंत सध्या रस्तेमार्गे १८ तासांचा प्रवास लागतो, मात्र नव्याने उभारल्या जाणाऱ्या या ग्रीनफिल्ड हायस्पीड एक्सप्रेसवेमुळे तो प्रवास अवघ्या ६ ते ७ तासांत पार करता येणार आहे. हा महामार्ग अटल सेतूपासून सुरु होऊन पुणे रिंगरोडला जोडला जाणार असून जवळपास ७०० किमी लांबीचा असणार आहे. एकूण ४०,००० कोटी रुपयांचा खर्च यासाठी अपेक्षित आहे.

या महामार्गामध्ये ५५ फ्लायओव्हर, २२ इंटरचेंज आणि २ इमर्जन्सी एअर स्ट्रिप्स असणार आहेत. यामुळं ना केवळ प्रवासाची गती वाढणार आहे, तर आपत्कालीन परिस्थितीतही हा महामार्ग उपयोगी ठरणार आहे. हा प्रकल्प भारतमाला योजनेच्या अंतर्गत राबवण्यात येत आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग

हा महामार्ग महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगलीसह कर्नाटकातील ९ प्रमुख जिल्ह्यांमधून जाईल. यात बंगळुरु ग्रामीण, बेलगावी, बागलकोट, गदग, कोप्पल, विजयनगर (बल्लारी), दावणगेरे, चित्रदुर्ग आणि तुमाकुरु यांचा समावेश आहे. तसेच पुण्याच्या रिंगरोडवरून सुरु होणारा हा महामार्ग बंगळुरुच्या सॅटेलाइट रिंगरोडवर मुथागदहल्ली येथे संपेल.

या एक्स्प्रेसवेमुळे १० प्रमुख नद्या पार केल्या जाणार आहेत. यामध्ये येरला, नीरा, चांद नदी, कृष्णा, अग्रनी, घाटप्रभा, तुंगभद्रा, मालाप्रभा, चिक्का आणि वेदवथ यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान निसर्गाचा आनंदही घेता येणार आहे.

या महामार्गामुळे मुंबई-पुणे-बंगळुरु या तीन शहरांमधील प्रवासाचे अंतर ९५ किलोमीटरने कमी होणार आहे. यामुळे व्यापारी आणि उद्योगजगतातील प्रवास अधिक वेगवान, सोयीस्कर आणि सुरक्षित होईल. सध्या १८ तास लागणारा प्रवास फक्त ७ तासांमध्ये पूर्ण होणार आहे.

या द्रुतगती मार्गावरून प्रवास २०२८ पासून शक्य होईल, अशी माहिती समोर आली आहे. हा महामार्ग देशातील लॉजिस्टिक नेटवर्कला गती देणारा गेमचेंजर प्रकल्प ठरणार आहे.

Title: Mumbai Bengaluru Expressway update 

 

Join WhatsApp Group

Join Now