विद्यार्थ्यांसाठी दिलासा! MPSC मुख्य परीक्षेच्या तारखा बदलल्या, नवीन वेळापत्रक जाहीर

On: April 18, 2025 8:19 AM
MPSC Exam
---Advertisement---

MPSC Mains 2024 | राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC Mains 2024) विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 एक महिना पुढे ढकलली असून, आता ही परीक्षा मे महिन्याच्या शेवटी पार पडणार आहे.

यापूर्वी राज्यसेवा मुख्य परीक्षा 26 ते 28 एप्रिल 2025 दरम्यान होणार होती. मात्र, काही उमेदवारांनी आयोगाकडे तांत्रिक अडचणींबाबत तसेच पर्याप्त तयारीसाठी अधिक वेळ मिळावा म्हणून निवेदने सादर केली होती. या निवेदनांचा सकारात्मक विचार करून आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता मुख्य परीक्षा 27, 28 आणि 29 मे 2025 रोजी घेतली जाणार आहे.

आरक्षणासंदर्भातील तांत्रिक गोंधळ

12 मार्च 2025 रोजी जाहीर झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालानंतर, काही EWS किंवा OPEN वर्गातून SEBC/OBC प्रवर्ग निवडलेल्या उमेदवारांच्या अर्जात बदल दिसून आला नाही. यामुळे अनेकांनी आयोगाकडे तक्रारी केल्या. 24 जुलै 2024 रोजी आयोगाने दिलेल्या शुद्धिपत्रकानुसार उमेदवारांनी NCL संदर्भात ‘Yes’/‘No’ असं स्पष्ट करणं अपेक्षित होतं. मात्र, अनेकांनी हा दावा न केल्याने त्यांच्या मूळ अर्जातील पर्याय कायम राहिला होता.

29 मार्च 2025 रोजी आयोगाने यासंबंधी शुद्धिपत्रक प्रसिद्ध करून, 318 नव्या उमेदवारांना पूर्व परीक्षेच्या सुधारित निकालानुसार मुख्य परीक्षेस पात्र ठरवलं. या नव्याने पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा, यासाठी मुख्य परीक्षा लांबवण्यात आली आहे. (MPSC Mains 2024)

का घेण्यात आला निर्णय?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट केलं आहे की, आरक्षण प्रक्रियेतील उद्भवलेली असामान्य स्थिती लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता राखण्यासाठी हा बदल करण्यात आलेला आहे. मात्र, हा निर्णय एकवेळचाच अपवाद आहे, अशी माहिती आयोगाने परिपत्रकातून दिली आहे.

Title : MPSC Mains 2024 Postponed by One Month

 

Join WhatsApp Group

Join Now