Mother Son Love | आईच्या प्रेमाला जगात तोड नाही. लेकरासाठी काहीही करण्याची आईची तयारी असते. हे आपण स्वतःच्या अनुभवातून किंवा आपल्या अवतीभवती घडणाऱ्या प्रसंगांमधून नेहमीच पाहत असतो. अशीच आईच्या प्रेमाची महती सांगणारी एक सत्य घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये एका मुलाला एका नामांकित ब्रँडचे अतिशय महागडे स्वेटर घेण्याची खूप इच्छा होती, परंतु ते त्याला परवडणारे नव्हते. मग त्याच्या आईने (Mother Son Love) काय शक्कल लढवली, ते पाहुयात…
संदीप मॉल असे त्या मुलाचे नाव आहे. त्याने स्वतःच त्याच्या आईने त्याच्यासाठी केलेल्या एका खास गोष्टीबद्दलची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो सांगतो की, त्याला गेल्या अनेक वर्षांपासून राल्फ लॉरेन (Ralph Lauren) या ब्रँडच्या एका स्वेटरची डिझाईन आणि रंग खूप आवडला होता.
आईने लेकासाठी विणले ‘राल्फ लॉरेन’ सारखे स्वेटर
त्याला ते स्वेटर घ्यायची खूप इच्छा होती, परंतु राल्फ लॉरेन हा एक मोठा ब्रँड असल्याने साहजिकच त्या स्वेटरची किंमतही खूप जास्त होती. तब्बल ३१ हजार रुपये किंमत असलेले ते स्वेटर त्याला, प्रचंड इच्छा असूनही, घेणे परवडणारे नव्हते.
जेव्हा त्याच्या आईला ही गोष्ट समजली, तेव्हा तिने त्या स्वेटरचा रंग, डिझाईन सगळे बारकाईने निरखून पाहिले आणि हुबेहूब तसे स्वेटर आपल्या लेकासाठी स्वतः विणले. साहजिकच, ते स्वेटर पाहून मुलाला खूप आनंद झाला. त्याच आनंदात त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. (Mother Son Love)
या पोस्टमध्ये त्याने एका बाजूला त्याला जे स्वेटर घ्यायचे होते त्याचा फोटो टाकला आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या आईने विणलेल्या स्वेटरचा फोटो शेअर केला आहे. आईने प्रेमाने विणलेल्या या स्वेटरची किंमत नक्कीच राल्फ लॉरेनपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे!
Was eying this Ralph Lauren sweater for years but was out of budget at 31000. माँ ने अपने हाथ में बेटे की इच्छा पूरी करने की जिम्मेदारी ले ली। pic.twitter.com/pt8lgzsAiK
— Sandeep Mall (@SandeepMall) January 25, 2025
Title : Mother Son Love mother knits ralph lauren style sweater for son viral post






