मोशी दुर्घटनेत ‘त्या’ ८३ तासांत नेमकं काय घडलं? 9 जणांचा मृत्यू

On: July 12, 2026 12:44 PM
Moshi Accident
---Advertisement---

Moshi Accident | पुणे (Pune) जिल्ह्यातील मोशी (Moshi) येथील ‘वेस्ट टू एनर्जी’ (Waste to Energy) प्रकल्पात घडलेल्या भीषण दुर्घटनेने राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा मोठा ढिगारा कोसळल्यानंतर सुरू झालेली बचाव आणि शोधमोहीम तब्बल 83 तास अखंड सुरू होती. या दुर्घटनेत 9 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर 9 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले.

8 जुलैपासून सुरू झाली जीव वाचवण्याची शर्यत :

8 जुलै रोजी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर अचानक कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळला. काही क्षणांत संपूर्ण इमारत कचऱ्याखाली गाडली गेली. दुर्घटनेच्या वेळी एकूण 23 कर्मचारी त्या परिसरात होते. त्यापैकी 22 कर्मचारी इमारतीमध्ये काम करत होते, तर एक कर्मचारी इमारतीबाहेर असूनही कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकला.

घटनेची माहिती मिळताच भारतीय सेना (Indian Army), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpri-Chinchwad Municipal Corporation), पीएमआरडीए (PMRDA) अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने संयुक्तपणे बचावकार्य सुरू केले. सुरुवातीला पाच कर्मचाऱ्यांनी स्वतःची सुटका केली, तर पहिल्याच रात्री बचाव पथकाने आणखी नऊ जणांना सुरक्षित बाहेर काढले. 9 जुलै रोजी दिवसभर उर्वरित बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध सुरू राहिला. यासाठी श्वान पथक, लाईव्ह डिटेक्टर, साउंड डिटेक्टर आणि अत्याधुनिक उपकरणांचा वापर करण्यात आला. मात्र, दिवसभर प्रयत्न करूनही कोणताही सकारात्मक संकेत मिळाला नाही. त्यामुळे नातेवाईकांची चिंता आणखी वाढली.

Moshi Accident | चार दिवसांच्या मोहिमेनंतर सर्वांचा शोध पूर्ण :

10 जुलै रोजी शोधमोहीमेच्या तिसऱ्या दिवशी भावेश वाणी (Bhavesh Wani) यांचा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर दुर्घटनेचे गांभीर्य अधिक स्पष्ट झाले. 11 जुलै रोजी इमारतीचा कोसळलेला काँक्रीटचा भाग जड यंत्रसामग्रीच्या साहाय्याने हटवण्यात आला. त्यानंतर बचाव पथकाला आत पोहोचणे शक्य झाले आणि दुपारपासून रात्रीपर्यंत अक्षय सावंत (Akshay Sawant), सुनील कोरके (Sunil Korke), सन्नी माने (Sunny Mane), महेश कुंभार (Mahesh Kumbhar), नागेश गायकवाड (Nagesh Gaikwad), रणजीत पाटील (Ranjit Patil) आणि राहुल गायकवाड (Rahul Gaikwad) यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

12 जुलै रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले वामन कसबे (Vaman Kasbe) यांचा मृतदेह सापडला. त्यानंतर सर्व बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध पूर्ण झाल्याने 83 तास चाललेली बचाव आणि शोधमोहीम अधिकृतरीत्या समाप्त करण्यात आली. या मोहिमेत सुमारे 90 जवान, डॉग स्क्वॉड, पोकलेन, डंपर आणि विविध यंत्रणांनी समन्वयाने काम केले. अनेकांचे प्राण वाचवण्यात यश आले असले, तरी नऊ कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुर्घटनेनंतर औद्योगिक सुरक्षितता, कचरा व्यवस्थापन आणि प्रशासकीय जबाबदारीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू आहे.

News Title: Moshi Rescue Ends After 83 Hours

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now