2 तास 20 मिनिटांचा कोर्टरूम ड्रामा; रिलीज होताच नेटफ्लिक्सवर नंबर 1

On: July 11, 2026 6:22 PM
Ikka Movie
---Advertisement---

Netflix Movie | ओटीटीवर रिलीज होताच या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अवघ्या 24 तासांतच हा कोर्टरूम ड्रामा नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग यादीत नंबर 1 वर पोहोचला असून प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. दोन तास 20 मिनिटांचा हा चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.

बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा बहुप्रतिक्षित कोर्टरूम ड्रामा ‘इक्का’ अखेर 10 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून, रिलीज होताच या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अवघ्या 24 तासांत हा चित्रपट नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट ठरल्याची चर्चा असून सोशल मीडियावरही त्याचं जोरदार कौतुक होत आहे.

नेटफ्लिक्सवर पाहा ‘इक्का’

दिग्दर्शक सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘इक्का’ हा एक दमदार कोर्टरूम ड्रामा आहे. जवळपास 29 वर्षांनंतर सनी देओल आणि अक्षय खन्ना पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसत आहेत. या चित्रपटात दिया मिर्झा, तिलोत्तमा शोम, संजीदा शेख आणि आकांक्षा रंजन कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

काय आहे चित्रपटाची कथा?

चित्रपटात सनी देओल एका तत्त्वनिष्ठ वकिलाच्या भूमिकेत दिसतो, जो नेहमी पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी लढतो. मात्र परिस्थिती अशी निर्माण होते की, त्यालाच आपल्या भूतकाळाशी संबंधित एका आरोपीचा (अक्षय खन्ना) बचाव करावा लागतो. कर्तव्य, नैतिकता आणि कुटुंब यांच्यातील संघर्षावर आधारित ही कथा शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

रिलीज होताच नंबर 1

‘इक्का’ला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून अनेकांनी सनी देओल आणि अक्षय खन्नाच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. विविध माध्यमांतील वृत्तांनुसार, रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट नेटफ्लिक्सवरील ट्रेंडिंग यादीत अव्वल स्थानी पोहोचला असून त्याने राम चरणच्या ‘पेड्डी’सह अनेक लोकप्रिय शीर्षकांना मागे टाकल्याची चर्चा आहे.

दोन तास 20 मिनिटांचा हा कोर्टरूम ड्रामा थरार, भावना आणि दमदार अभिनय यांचा उत्कृष्ट मेळ घालतो. त्यामुळे सस्पेन्स आणि कोर्टरूम ड्रामा आवडणाऱ्यांसाठी ‘इक्का’ हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

News Title: Netflix Movie Ikka Success Courtroom Drama Sunny Deol Akshay Khanna

Join WhatsApp Group

Join Now