पार्थ पवारांचा होणार साखरपुडा! रोहित पवारांनी दिल्या शुभेच्छा

On: July 12, 2026 1:34 PM
Parth Pawar Engagement
---Advertisement---

Parth Pawar Engagement | पवार (Pawar) कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खासदार पार्थ पवार (Parth Pawar) आणि कायनात धार (Kainaat Dhar) यांच्या साखरपुड्याची तारीख निश्चित झाली असून, त्यासंबंधीची पत्रिका सोशल मीडियावर समोर आली आहे. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ही पत्रिका शेअर करत नवदाम्पत्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.

रोहित पवारांनी पत्रिका शेअर करत दिल्या शुभेच्छा :

29 जुलै रोजी पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा पार पडणार असल्याची माहिती पत्रिकेतून समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या विवाहाची चर्चा सुरू होती. आता साखरपुड्याची तारीख निश्चित झाल्याने या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले आहे. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पत्रिका शेअर करत दोघांच्या नव्या आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.

रोहित पवार यांनी आपल्या संदेशात, “प्रेमाच्या रेशीमगाठीत अडकून नवी इनिंग सुरू करणारे माझे प्रिय बंधू खा. पार्थ आणि कायनात या दोघांनाही साखरपुड्याच्या मनापासून शुभेच्छा. तुमचा पुढील प्रवास आनंद, सुख आणि समृद्धीने भरलेला असो. तुमच्या दोघांमधील प्रेमाचे नाते दिवसेंदिवस अधिक दृढ होत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना,” अशा भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या या पोस्टकडे सोशल मीडियावर मोठे लक्ष वेधले गेले आहे.

Parth Pawar Engagement | आधीपासूनच चर्चेत होती पार्थ-कायनातची जोडी :

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (Nationalist Congress Party – Sharad Pawar Faction) च्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या कन्या रेवती सुळे (Revati Sule) यांच्या मुंबई (Mumbai) येथे झालेल्या विवाहसोहळ्यात पार्थ पवार आणि कायनात धार एकत्र उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यासह या दोघांची उपस्थिती अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली होती.

कायनात धार यांचे पवार कुटुंबाशी आधीपासूनच जवळचे संबंध असल्याचे सांगितले जाते. त्या यापूर्वीही पार्थ पवार यांच्यासोबत विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी दोघांनी मध्य प्रदेश (Madhya Pradesh) येथील महाकाल मंदिर (Mahakal Temple) येथे एकत्र दर्शन घेतले होते. त्या भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. आता साखरपुड्याची तारीख जाहीर झाल्यानंतर पवार कुटुंबातील या आनंदाच्या बातमीची राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून, दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

News Title: Parth Pawar Engagement Date Confirmed

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now