वृद्ध महिलेच्या अंत्ययात्रेला वानराची हजेरी; लोक म्हणाले तिचा पती ‘मारुती’ आला

On: January 30, 2025 12:07 PM
Monkey
---Advertisement---

Monkey l असे म्हणतात की माणसाचा पुनर्जन्म (Rebirth) होत असतो. तो कोणत्याही व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या रूपात जन्माला येऊ शकतो. विज्ञान (Science) मात्र पुनर्जन्माची संकल्पना मान्य करत नाही. पण चंद्रपूरमध्ये (Chandrapur) घडलेल्या एका घटनेमुळे लोक पुनर्जन्माची चर्चा करू लागले आहेत. एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्या अंत्ययात्रेला (Funeral) एक वानर (Monkey) आले. हे वानर अंत्यविधी होईपर्यंत तेथेच थांबले. त्यामुळे गावात या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.

वरोरा (Warora) तालुक्यातील टेंमुर्डा (Temurda) नजीक असलेल्या पिंपळगाव मारुती (Pimplgaon Maruti) येथील विजय मारोती धवणे (Vijay Maruti Dhawane) यांच्या मातोश्री अनुसया मारोती धवणे (Anusuya Maruti Dhawane) यांचे बुधवार, 29 जानेवारी रोजी वयाच्या 75 व्या वर्षी वृद्धापकाळाने (Old Age) निधन झाले. आईचे निधन झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दुपारी सगळे नातेवाईक जमा झाले. अनुसया यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू झाली. अनुसया यांचे पार्थिव स्मशानभूमीत (Crematorium) नेत असताना, साक्षात हनुमानजीचे (Hanuman) रूप समजले जाणारे एक वानर त्यांच्या घरी आले आणि अनुसया यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना नमस्कार केला.

वानराने काढला डोळ्यावरील चष्मा :

हे वानर स्मशानभूमीपर्यंत पोहोचले. सगळ्यांना वाटले आता हे वानर तिथून निघून जाईल. पण त्या वानराने मृतदेहाजवळ जाऊन बांगड्या (Bangles) फोडल्या, डोक्यावरील पदर काढला. मृतदेहाला चक्क मिठी मारून डोळ्यावरील चष्मा (Spectacles) काढला. तसेच अग्निसंस्कार (Cremation) होईपर्यंत वानर स्मशानभूमीत उपस्थित राहिले. त्यानंतर ते नातेवाईकांसोबत त्यांच्या घरापर्यंत आले आणि नंतर निघून गेले.

नातेवाईक जेव्हा अनुसया यांच्या अस्थी (Ashes) घेण्यासाठी स्मशानभूमीत गेले तेव्हा पुन्हा हे वानर तेथे उपस्थित होते आणि अस्थी उचलताना सुद्धा ते तिथे आले. जेव्हा नातेवाईक अस्थी घेऊन घरी आले तेव्हाही हे वानर सोबत आले. त्यानंतर ते वानर तिथून निघून गेले.

20 वर्षांपूर्वी पतीने घेतला होता निरोप :

अनुसया यांचे पती मारुती धवणे यांचे 20 वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या पतीचे नाव मारुती धवणे होते. आज अनुसया यांच्या अंत्यविधीच्या वेळी बजरंगबलीचे (Bajrangbali) रूप समजले जाणारे वानर मृत्यूनंतर त्यांना भेटायला येणे हा योगायोग (Coincidence) की चमत्कार (Miracle) असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला आहे.

या घटनेमुळे अनेकांना पुनर्जन्मावर विश्वास ठेवण्यास भाग पाडले आहे. मृत्यूनंतरही नाती टिकून राहतात, याचा हा पुरावा असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

News Title: Monkey-Attends-Old-Womans-Funeral-Stays-Till-Cremation-Rebirth-Or-Coincidence-Chandrapur

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now