दिग्दर्शक सनोज मिश्राबद्दल मोनालिसाचा खुलासा, म्हणाली ‘त्यांनी मला चुकीच्या..’

On: April 16, 2025 2:49 PM
Monalisa , Sanoj Mishra
---Advertisement---

Monalisa | ‘महाकुंभ’मधून प्रसिद्धी मिळवणारी मोनालिसा (Monalisa) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती दिग्दर्शक सनोज मिश्रा (Sanoj Mishra) यांच्याबद्दल आपली बाजू मांडताना दिसते. मोनालिसाने स्पष्ट केलं आहे की सनोज मिश्रा यांनी तिला कधीही चुकीच्या नजरेने पाहिलं नाही आणि त्या विरुद्ध पसरवले जाणारे आरोप पूर्णपणे खोटे आहेत.

सनोज मिश्रा यांच्यावर बलात्काराचे आरोप-

१३ एप्रिल रोजी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये मोनालिसा म्हणते, “नमस्ते, आज १३ एप्रिल आहे. मी काही गोष्टी सांगू इच्छिते. अनेकांनी सोशल मीडियावर अश्लील गोष्टी पसरवल्या आहेत. सनोजजी मला त्यांच्या मुलीप्रमाणे मानतात. त्यांनी मला कधीही चुकीच्या नजरेने पाहिलं नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Mona lisa (@monalisakumbhmela)

हे वक्तव्य तिने अशा वेळी केलं आहे जेव्हा सनोज मिश्रा यांच्यावर एका महिलेनं बलात्कार व गर्भपातासारख्या गंभीर आरोपांची तक्रार दाखल केली होती. त्या प्रकरणात त्यांची अटकही झाली होती.

फिल्म ऑफरपासून स्टेज डेब्यूपर्यंतचा मोनालिसाचा प्रवास-

महाकुंभच्या वेळी मोनालिसावर लक्ष गेल्यानंतर सनोज मिश्रा यांनी तिला ‘द डायरीज ऑफ मणिपूर’ या चित्रपटासाठी ऑफर दिली होती. त्यानंतर तिचं प्रशिक्षण सुरू झालं. मोनालिसाच्या इंस्टाग्रामवर तिच्या नृत्याचे, शिक्षण घेण्याचे काही क्लिप्सही व्हायरल झाल्या होत्या.

शिवरात्रीच्या निमित्ताने सनोज मिश्रा आणि मोनालिसा दोघेही नेपाळमध्ये गेले होते. तिथेच मोनालिसाने पहिल्यांदाच स्टेजवर परफॉर्म केलं. पब्लिक प्लॅटफॉर्मवरचा तिचा पहिला डान्स बघून चाहत्यांनी तिच्या आत्मविश्वासाचं कौतुक केलं. सध्या तिचा सिनेमा अनिश्चिततेच्या अवस्थेत असला, तरी मोनालिसा आपल्या बाजूने स्पष्टपणे बोलली आहे.

 Title: Monalisa Defends Sanoj Mishra Online

 

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now