“धर्माच्या नावावर हत्या…”; अमित शाह यांचा फोटो पोस्ट करत प्रसिद्ध क्रिकेटपटूची मोठी मागणी

On: April 23, 2025 9:06 PM
Pahalgam Attack
---Advertisement---

Pahalgam Attack | काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना, आता भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनेदेखील या घटनेबाबत आपला आवाज उठवला आहे. सिराजने गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो शेअर करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. (Pahalgam Attack )

मोहम्मद सिराजची पोस्ट-

22 एप्रिल रोजी पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला, तर 17 जण गंभीर जखमी झाले. या पार्श्वभूमीवर मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) ने सोशल मीडियावर लिहिले की, “ही घटना फारच वेदनादायक आहे. धर्माच्या नावावर निष्पाप लोकांना ठार मारणं हे मानवतेच्या विरोधातलं कृत्य आहे. अशा हिंसेला कोणतंही कारण योग्य ठरू शकत नाही.”

त्याने पुढे लिहिलं, “ही कसली लढाई आहे, जिथे माणसाच्या जिवाला काहीच किंमत उरलेली नाही? जे आपल्या प्रियजनांना गमावतात, त्यांचं दुःख शब्दात मांडणं अशक्य आहे. या कठीण काळातून ते लवकर बाहेर पडावेत अशी प्रार्थना करतो. दोषींना कठोर शिक्षा मिळावी, आणि अशी घटना पुन्हा कधीच घडू नये.”

गुजरात टायटन्सकडून प्रतिनिधित्व

सिराजने आपल्या पोस्टमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा मृतांना श्रद्धांजली देतानाचा फोटोही शेअर केला आहे.  त्याने अप्रत्यक्षपणे सरकारकडे याप्रकरणी कठोर पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

सध्या आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळत असलेल्या सिराजने या हंगामात उत्तम कामगिरी केली आहे. त्याने 8 सामन्यांमध्ये 12 विकेट्स घेतल्या असून एका सामन्यात 4 विकेट्ससह 17 धावांची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्स संघ सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानी आहे. मात्र देशात घडलेल्या या हल्ल्यामुळे क्रिकेटपटूंसह अनेक खेळाडू भावनिक झाले आहेत.

Title : Mohammed Siraj on Pahalgam Attack says No War Justifies Killing Innocents 

 

 

Join WhatsApp Group

Join Now