मनसेने चौथी यादी केली जाहीर! पाहा कोणाला मिळाली उमेदवारी?

On: October 26, 2024 11:34 AM
Raj Thackeray
---Advertisement---

MNS Fourth List l महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लागू झाली आहे. त्यामुळे सर्वच पक्ष आपापले उमेदवार जाहीर करत आहेत. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आणखी पाच जणांना उमेदवारी दिली आहे. या यादीमध्ये पुणे, चिखली आणि कोल्हापूरचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मात्र आता आपण जाणून घेऊयात मनसेने कोणाकोणाला उमेदवारी दिली आहे.

चौथ्या यादीत कोणाला मिळाली उमेदवारी? :

गणेश भोकरे, कसबा पेठ
गणेश बरबडे, चिखली
रमेश गालफाडे, केज
संदीप उर्फ बाळकृष्ण हटगी, कलीना
अभिजित राऊत, कोल्हापूर, उत्तर

MNS Fourth List l राज ठाकरेंनी केला महाराष्ट्र दौरा :

मनसेने ही यादी जाहीर केली आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणूक लढवण्याची देखील जोरदार तयारी केली असल्याचं दिसत आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्राचा दौरा देखील केला आहे. या दौऱ्यादरम्यान मनसेने 200 ते 225 जागा लढणार आहोत असं जाहीर देखील केलं होतं. त्यानुसार आता ही नावं समोर येत आहेत. तसेच आता राज ठाकरे हे राज्यभर सभा देखील घेणार आहेत.

News Title – MNS Fourth List

महत्त्वाच्या बातम्या-

न्यायाधीशाला मॅनेज केल्याचा भुजबळांवर आरोप; कोणी केला आरोप?

दिवाळीतही धो-धो बरसणार?, हवामान विभागाने दिला महत्वाचा इशारा

“विखेंनी राजकारणाची घाणेरडी पातळी गाठली, नीच लोकांना त्यांची जागा..”; सत्यजित तांबे संतापले

ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर; भाजप-शिंदे गटाविरोधात दिले ‘हे’ तगडे उमेदवार

जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची खालच्या पातळीवर टीका; संगमनेरमध्ये राजकारण पेटलं

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now