जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची खालच्या पातळीवर टीका; संगमनेरमध्ये राजकारण पेटलं

On: October 26, 2024 8:40 AM
Sangamner offensive statements about Jayashree Thorat
---Advertisement---

Sangamner | भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या युवा संकल्प मेळाव्यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करण्यात आल्याने संगमनेरमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. कॉँग्रेसकडून येथे आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. काल शुक्रवारी रात्री अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. कॉँग्रेसकडून येथे रात्रभर ठिय्या आंदोलन देखील करण्यात आलं. (Sangamner )

संगमनेर मतदारसंघातील धांदरफळ येथे आयोजीत युवा संकल्प सभेत भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी आपल्या भाषणात जयश्री थोरात यांच्यावर खालच्या पातळीवर टिका केली. त्यानंतर शहरातील वातावरण चांगलंच पेटलं. टीका करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीसाठी रात्री उशिरा पोलीस ठाण्यासमोर जयश्री थोरात आणि दुर्गाताई तांबे यांच्यासह शेकडो थोरात समर्थकांनी ठिय्या आंदोलन केलं.

संगमनेरमध्ये विखे-थोरात वाद चिघळला

तब्बल 7 तास हे आंदोलन सुरू होतं. या प्रकरणी पहाटे पाच पर्यंत दोन फिर्यादी दाखल करण्यात आले असून तिसरी फिर्याद नोंदवण्याचं काम सुरू असल्याचं कळतंय. या घटनेनंतर सुजय विखे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी त्यांना ताई म्हणून संबोधलं, त्यामुळे महिलांचा सन्मान व्हायलाच हवा असं सुजय विखेंनी म्हटलंय. तसेच, आमच्या गाड्या ज्यांनी जाळल्या त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी देखील विखे पाटील यांनी केली. (Sangamner )

तर, दुर्गाताई तांबे यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केलाय. एकीकडे लाडकी बहीण योजना आणण्याचं व त्याचा प्रचार करायचा आणि दुसरीकडे महिलांविषयी असे अपशब्द वापरायचे, असं दुर्गाताई तांबे म्हणाल्या आहेत.

नेमकं घडलं काय?

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात काल 25 ऑक्टोबररोजी सुजय विखे यांची सभा झाली. या सभेत बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलं. “तुमच्या कन्येला समजवा, नाहीतर आम्ही निवडणुकीच्या काळात मैदानात उतरलो, तर तुमची मुलगी घराबाहेर पडणार नाही. सुजय विखे पाटील, त्यांना ताई म्हणातात. पण सुजयदादा या ताईचे पराक्रम सगळ्या तालुक्याला माहिती आहे.”, असं वक्तव्य भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी केलं. यानंतर कॉँग्रेसकडून याचा तीव्र विरोध करण्यात आला. देशमुख यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. (Sangamner )

News Title –  Sangamner offensive statements about Jayashree Thorat

महत्त्वाच्या बातम्या-

आज मेष, वृषभसह ‘या’ राशीवर राहील शनीदेवाची कृपा!

महायुतीचा मोठा डाव! आदित्य ठाकरें विरुद्ध उतरवला ‘हा’ बडा नेता

शरद पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न चिघळवला, ‘या’ नेत्याचं टीकास्त्र

पुण्यातील ‘या’ भागात कंटेनरमध्ये सापडलं 138 कोटींचं सोनं!

दिवाळीत लक्ष्मीपूजन 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबररोजी?; जाणून घ्या शुभ मुहूर्त व पूजा विधी

Join WhatsApp Group

Join Now