नाशिकमधील कॅफेवर अचानक धाड, अंधाऱ्या खोल्यामध्ये सुरू होता धक्कादायक प्रकार

On: March 1, 2025 4:05 PM
MLA Devyani Pharande Raids Nashik Cafe Over Immoral Activities
---Advertisement---

Nashik Cafe | नाशिकच्या (Nashik) गंगापूर रोडवरील एका कॅफेमध्ये (Cafe) सुरू असलेल्या गैरप्रकारांवर आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांनी थेट कारवाई केली आहे. या कॅफेमध्ये (Nashik Cafe) तरुण-तरुणींना तासाला १०० ते २०० रुपये भाड्याने रूम दिल्या जात होत्या आणि तिथे अश्लील चाळे सुरू असल्याचा आरोप आहे.

कॅफेमधील गैरप्रकार

गंगापूर रोडवरील विद्या विकास सर्कलजवळील हॉटेल मोगली कॅफेमध्ये (Hotel Mogali Cafe) अत्यंत अंधाऱ्या खोलीत हे सगळे प्रकार सुरु होते. या कॅफेबाबत (Cafe) अनेक तक्रारी आल्यानंतर आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांनी स्वतः पोलिसांना सोबत घेऊन छापा टाकला.

छाप्यादरम्यान, या कॅफेमध्ये (Cafe) तरुण-तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत आढळले. आमदार फरांदे (Devyani Pharande) यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाई करत या तरुण-तरुणींना रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.

आमदार फरांदेंची प्रतिक्रिया

कॅफेवर (Cafe) कारवाई केल्यानंतर, भाजप (BJP) आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “या कॅफेमध्ये (Cafe) तासांसाठी भाड्याने रूम दिल्या जात होत्या. याची माहिती मिळाल्यानंतर मी धाड टाकली. गंगापूर आणि सरकारवाडा पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीत हे भयंकर प्रकार सुरू होते. नाशिकची (Nashik) संस्कृती बिघडवण्याचं काम सुरू आहे.”

“कॉलेजला न जाता तरुणवर्ग कॅफेमध्ये (Cafe) येतात. आम्ही कोणाच्याही खासगी आयुष्यात ढवळाढवळ करत नाही, पण ड्रग्जसारख्या गोष्टी येथे केल्या जाणार नाहीत. इंदिरानगर भागातूनही अशा तक्रारी येत आहेत. मी याकडे बारकाईने लक्ष देत आहे.”, असं आमदार आमदार फरांदे म्हणाल्या.

पुढे त्यांनी सांगितलं की, “माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी धाड टाकली आहे. स्थानिक पोलिसांना (Police) पोहोचायला उशीर झाला. कॅफेच्या (Cafe) नावाखाली गैरवापर केला जात आहे, ज्यामुळे मुलींची फसवणूक होऊ शकते. इंदिरानगरमध्येही असेच प्रकार सुरू होते, त्याची दखल घेऊन कारवाई करण्यात आली आहे,” असेही आमदार फरांदे (Devyani Pharande) म्हणाल्या. तसेच, पालकांनी आपली मुले खरोखरच कॉलेजला जातात की नाही, याकडे लक्ष ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Title : MLA Devyani Pharande Raids Nashik Cafe Over Immoral Activities

 

Join WhatsApp Group

Join Now