मुंबईत हादरवणारी घटना! अल्पवयीन प्रेमियुगलाची धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या

On: January 27, 2025 2:12 PM
Kolhapur Crime
---Advertisement---

Mumbai News l मुंबईतील विक्रोळीमधून (Vikhroli) एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन प्रेमियुगलाने (Minor Couple) टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले आहे. या घटनेत मुलीचे वय अवघे १५ वर्ष असून मुलाचे वय १९ वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे.

लग्नासाठी घरच्यांचा विरोध (Family Opposition for Marriage) असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या दोघांनी धावत्या रेल्वे एक्सप्रेससमोर (Running Express Train) उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे.

Mumbai News l धावत्या एक्सप्रेससमोर उडी घेऊन संपवले आयुष्य :

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना २६ जानेवारीच्या दुपारच्या सुमारास घडली. यातील पंधरा वर्षीय मुलगी परप्रांतीय (Other State) असून मुलगा महाराष्ट्रातील रहिवासी (Resident of Maharashtra) आहे.

या दोघांमध्ये जवळीक असून त्यांच्या प्रेम प्रकरणाला प्रांतीय अथवा जातीय (Caste) अडसर येऊन लग्नाला विरोध झाला होता का? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. हे दोघेही भांडुपच्या (Bhandup) हनुमान नगर परिसरातील (Hanuman Nagar Area) रहिवासी आहेत.

ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी ही मुलगी आपल्या आजीसोबत बाहेर गेली होती. मात्र, मध्येच ही मुलगी आजीपासून वेगळी झाली. त्यानंतर ती बेपत्ता (Missing) असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी तिचा शोध सुरू केला असता रेल्वे पोलिसांनी (Railway Police) याबाबत माहिती दिल्याने हे संपूर्ण प्रकरण आज उघडकीस आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

News Title: minor-couple-commits-suicide-by-jumping-in-front-of-train-in-vikhroli-mumbai

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now