MHADA Home Fraud | ‘म्हाडा’चे (MHADA) फ्लॅट मिळवून देण्याच्या बहाण्याने शेकडो जणांची फसवणूक (Fraud) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अटक केलेल्या संशयिताला २९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याला बुधवारी (दि. २९) पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याच्या साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या प्रकरणात ६०० पेक्षा जास्त नागरिकांची फसवणूक झाली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. (MHADA Home Fraud)
प्रतीक राजेश धाईजे (रा. दिघी रोड, भोसरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित प्रतीक म्हाडाचे घर मिळवून देतो, असे लोकांना सांगायचा. त्यासाठी बनावट लेटरहेड (Fake Letterhead) तयार करून तसेच लॉटरी आणि इतर माहितीबाबत लेखी पत्र देऊन त्याने शेकडो नागरिकांची २२ लाख ४१ हजार ७६० रुपयांची फसवणूक केली.
२२ लाखांची फसवणूक केल्याचा प्राथमिक अंदाज
दरम्यान, याबाबत पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) गुन्हे शाखा युनिट एकच्या (Crime Branch Unit 1) पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी प्रतीकला अटक केली आहे.
प्रतीकने फसवणूक केलेल्यांपैकी ७५ नागरिकांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. फसवणुकीच्या रकमेचा आकडा तसेच फसवणूक झालेल्यांची संख्या वाढणार असल्याचा अंदाज तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक (PSI) सोमनाथ टापरे (Somnath Tapre) यांनी व्यक्त केला.
‘हक्काचे घर मिळणार म्हणून शेकडो लोकांनी…’
हक्काचे घर मिळणार म्हणून शेकडो लोकांनी प्रतीककडे पैसे दिले. घर लागल्यानंतर आणखी पैसे देण्याचे कबूल केले. त्याने बनावट लेटरहेडवर घर लागल्याचे लिहून दिले. (MHADA Home Fraud)
त्याने म्हाडाचे घर देण्याच्या नावाखाली पैसे घेऊन फसवणूक केल्याचे कबूल केले. त्याने फसवणूक केलेल्या लोकांची यादी वाढत आहे. त्याला या फसवणूक प्रकरणात मदत करणाऱ्या साथीदारांचा शोध सुरू आहे.
Title : MHADA Home Fraud Hundreds of People Cheated in Pimpri Chinchwad






