PNB घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सी अखेर अटकेत, आता संपत्तीवर कारवाईचा बडगा!

On: April 14, 2025 8:11 AM
Mehul Choksi Arrested in Belgium
---Advertisement---

Mehul Choksi |  कोट्यवधींचा पीएनबी घोटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. भारताच्या विनंतीवरून बेल्जियम पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सीबीआयच्या सूचनेनंतर बेल्जियम पोलिसांची कारवाई

२०१८ मध्ये पंजाब नॅशनल बँकेतील (Punjab National Bank) तब्बल १३,५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणात मेहुल चोक्सी आणि त्याचा पुतण्या नीरव मोदी यांच्यावर (Nirav Modi) गंभीर आरोप झाले होते. आर्थिक गैरव्यवहार करून भारतातून फरार झालेल्या चोक्सीविरुद्ध सीबीआय (CBI) आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ED) रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्यानंतर त्याचा शोध सुरू असताना, अखेर शनिवारी बेल्जियम पोलिसांनी सीबीआयच्या विनंतीवरून त्याला ताब्यात घेतलं.

अलीकडे काही दिवसांपूर्वी चोक्सी आजारी असून त्याला कॅन्सर असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. या कारणाचा आधार घेत त्याने भारतात येण्यास टाळाटाळ केली होती. मात्र, आता बेल्जियम पोलिसांकडून अटकेनंतर त्याचं भारतात प्रत्यार्पण करण्यासाठीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

पासपोर्ट रद्द, संपत्तीवर कारवाई सुरू

भारत सरकारने चोक्सीचा पासपोर्ट आधीच रद्द केला आहे. पीएमएलए (PMLA) न्यायालयाने या संदर्भातील सर्व कागदपत्रे आणि ईडीने दाखल केलेल्या प्रकरणाशी संबंधित तपास फाईल मागवण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर, चोक्सीला आर्थिक अडचणीत टाकण्यासाठी त्याच्या संपत्तीवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

चोक्सीने आपल्या याचिकेत प्रकृती अस्वस्थतेचं कारण देत भारतात येणं सध्या शक्य नसल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे त्याचा प्रत्यार्पण लांबणीवर गेला होता. मात्र आता अटकेमुळे ही प्रक्रिया अधिक गतिमान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२०१८ चा सर्वात मोठा बँक घोटाळा

२०१८ मध्ये पीएनबी बँकेत हजारो कोटींचा घोटाळा उघडकीस आला होता. या घोटाळ्यात मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी बँकांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत फसवणूक केली. घोटाळा उघड झाल्यानंतर दोघेही देश सोडून पळाले. चोक्सी हा नीरव मोदीचा काका आहे. यानंतर त्यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आणि दोघांचाही तपास वेगाने सुरू झाला.

Title : Mehul Choksi Arrested in Belgium

 

 

Join WhatsApp Group

Join Now