‘माझा नवरा नपुंसक…’; माजी मुख्यमंत्र्याच्या भाचीचे सासरच्यांबाबत धक्कादायक खुलासे

On: April 11, 2025 2:47 PM
Sangli News
---Advertisement---

Mayawati niece news | बहुजन समाजवादी पक्षाच्या (BSP) प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री (Mayawati) यांच्या भाचीने आपल्या पतीसह सासरच्या सात जणांवर गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. एलिस या पीडितेने हापुड (Hapur) न्यायालयाच्या आदेशानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्यावर हुंड्यासाठी छळ झाल्याचा आरोप करताना एलिसने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

माजी मुख्यमंत्र्यांच्या भाचीचा हुंड्यासाठी छळ

पीडितेने सांगितले की, सासरचे लोक सतत गाझियाबादमधील इंदिरापुरम येथे फ्लॅट आणि ५० लाख रुपयांची मागणी करत होते. जेव्हा तिने नकार दिला, तेव्हा तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार करण्यात आले. एवढंच नव्हे, तर तिचा पती विशाल सिंह लग्नाआधीपासून स्टेरॉइड्स घेऊन बॉडी बनवत होता, ज्यामुळे तो नपुंसक झाला. हे माहीत असूनही सासरच्या लोकांनी तिला माहिती न देता विवाह केला.

तक्रारीत एलिसने हेही सांगितले की, जेव्हा तिने सासू आणि नणंदकडे याबाबत विचारले, तेव्हा त्यांनी ‘मुलगा नसेल तर मोठ्या दिराकडून मूल करून घे’ असा संतापजनक सल्ला दिला.

एफआयआर नंतरच दाखल

एलिसने सांगितले की, सासरच्या लोकांनी तिच्यावर वारंवार दबाव टाकत हुंड्याची मागणी केली. १७ फेब्रुवारीला तिच्या सासऱ्यांनी आणि दिराने खोलीत घुसून मारहाण केली. पोलिसांकडे तक्रार केली असतानाही सासूबाईंच्या राजकीय दबावामुळे ती तक्रार नोंदवली गेली नाही. शेवटी २४ मार्च रोजी एलिसने मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल केली. ८ एप्रिल रोजी कोर्टाने एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले.

त्यानुसार, हापुड कोतवाली पोलीस ठाण्यात एलिसचा पती विशाल सिंह, सासरे श्रीपाल सिंह, सासू पुष्पा देवी, जेठ भूपेंद्र उर्फ मोनू, जेठाणी निशा, नणंद शिवानी आणि आतेसासरे अखिलेश यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. एलिसने यावेळी स्पष्ट सांगितले की, ‘माझी आत्याबाई मायावती असूनही मला न्याय मिळत नव्हता. सासरच्या लोकांनी माझ्यावर इतका अत्याचार केला की, जीव वाचवण्यासाठी कोर्टाची मदत घ्यावी लागली.’

Title : Mayawati’s Niece Alleges Dowry Torture

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now