भंडाऱ्यातील कारखान्यामध्ये भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

On: January 24, 2025 2:36 PM
Bhandara
---Advertisement---

Bhandara l भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील जवाहरनगर (Jawaharnagar) येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत (Ordnance Factory) आज (२४ जानेवारी) सकाळी साडेदहा ते पावणे अकराच्या सुमारास भीषण स्फोट (Explosion) झाला. या स्फोटात (Explosion) पाच जणांचा मृत्यू (Death) झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फॅक्टरीच्या (Factory) आर. के. ब्रांच (R. K. Branch) सेक्शनमध्ये (Section) हा स्फोट झाला. साबुदाण्यासारखा दिसणारा कच्चा माल, जो आरडीएक्स (RDX) बनवण्यासाठी वापरला जातो, त्यामध्ये हा स्फोट (Explosion) झाल्याचे समजते.

या अपघातात (Accident) गंभीर जखमी (Seriously Injured) झालेल्या पाच जणांना भंडारा (Bhandara) येथील खाजगी लक्स हॉस्पिटलमध्ये (Luxe Hospital) उपचारासाठी (Treatment) दाखल करण्यात आले आहे.

नेत्यांकडून (Leaders) दु:ख व्यक्त; सरकारवर (Government) टीका :

या दुर्घटनेनंतर काँग्रेस नेते (Congress Leader) विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Congress State President) नाना पटोले (Nana Patole) यांनी शोक (Condolences) व्यक्त केला आहे. “ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. प्राथमिक माहितीनुसार पाच जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी (Injured) आहेत,” असे विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.

दुसरीकडे, नाना पटोले (Nana Patole) यांनी या घटनेवरून सरकारवर (Government) टीकास्त्र सोडले आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) काळात ऑर्डनन्स फॅक्टरी (Ordnance Factory) देखील सुरक्षित नाहीत. आरडीएक्स (RDX) आयात (Import) करताना त्यात भ्रष्टाचार (Corruption) होतो, हे नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारचे अपयश आहे. पहिल्यांदाच असा स्फोट (Explosion) झाला आहे,” अशी प्रतिक्रिया नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली.

तपास सुरू; सुरक्षेवर (Safety) प्रश्नचिन्ह :

या स्फोटाचे (Explosion) नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस (Police) आणि संबंधित यंत्रणा (Agencies) घटनास्थळी (Spot) दाखल झाल्या असून, पुढील तपास (Investigation) सुरू आहे. या घटनेमुळे ऑर्डनन्स फॅक्टरीमधील (Ordnance Factory) सुरक्षा व्यवस्थेवर (Security System) प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

News Title : Massive Explosion at Ordnance Factory in Bhandara; 5 Dead, Toll May Rise

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now