Maruti Nexa April 2025 Offers | एप्रिल 2025 मध्ये मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ने आपल्या नेक्सा (Nexa) डीलरशिपद्वारे विकल्या जाणाऱ्या प्रीमियम कार्सवर मोठ्या प्रमाणात सूट दिली आहे. या महिन्यात कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही संधी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. इग्निसपासून इन्व्हिक्टो पर्यंत अनेक मॉडेल्सवर रोख सवलत, एक्सचेंज बोनस, स्क्रॅपेज ऑफर यांचा समावेश आहे. (Maruti Nexa April 2025 Offers)
‘या’ कार्सवर मिळतेय ऑफर
इग्निस (Ignis): या एएमटी प्रकारावर ₹62,100 पर्यंत सूट मिळू शकते. ही कार नेक्साची सर्वात स्वस्त कार आहे.
बलेनो (Baleno): प्रीमियम हॅचबॅक प्रकारात येणाऱ्या बलेनोवर ₹50,000 पर्यंत डिस्काउंट. सिग्मा आणि AMT प्रकारांना विशेष लाभ.
सियाझ (Ciaz): मध्यम आकाराच्या सेडानवर ₹40,000 ची बचत करता येईल. ही सूट सर्व व्हेरिएंट्ससाठी लागू आहे.
फ्रॉन्क्स (Fronx): टर्बो प्रकारावर ₹45,000 पर्यंत डिस्काउंट. CNG व्हर्जनला रोख सूट नाही, पण स्क्रॅपेज/एक्सचेंज बोनस दिला जातो.
जिमनी (Jimny): ऑफ-रोड SUV चाहत्यांसाठी खास ऑफर – ₹1 लाख पर्यंतची सूट अल्फा व्हेरिएंटसाठी उपलब्ध असून बेस व्हेरिएंट झेटाला सूट नाही.
ग्रँड विटारा (Grand Vitara): मजबूत हायब्रिड प्रकारावर ₹1.35 लाखांपर्यंत बचत. डेल्टा, झेटा, अल्फा व्हेरिएंटला काही प्रमाणात सूट, पण सिग्मा आणि CNG प्रकारांना रोख सवलत नाही.
XL6: MPV वर्गातील या गाडीसाठी ₹25,000 स्क्रॅपेज बोनसची ऑफर आहे.
इन्व्हिक्टो (Invicto): सर्वात मोठी सूट – ₹1.40 लाखांपर्यंत बचत होईल. ही एक प्रीमियम MPV असून झेटा प्रकाराला मात्र रोख सूट नाही.
शोरूममध्ये मिळेल अचूक माहिती
या ऑफर्स शहरानुसार, डीलरशिपनुसार आणि कारच्या उपलब्धतेनुसार बदलू शकतात. त्यामुळे आपल्याला जवळच्या नेक्सा शोरूममध्ये जाऊन सविस्तर माहिती घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही एप्रिल 2025 मध्ये मारुतीची प्रीमियम कार घेण्याचा विचार करत असाल, तर हीच योग्य वेळ आहे.
English Title : Maruti Nexa April 2025 Offers Save Up to 1.4 Lakh






