Santosh Deshmukh | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर, मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळीच मस्साजोग गावाला भेट देऊन संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांची भेट घेतली.
जरांगे-देशमुख भेट
मनोज जरांगे पाटील यांना दारात पाहताच धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी हंबरडा फोडला. लहान मुलाप्रमाणे ते जरांगे यांच्या गळ्यात पडून रडले. या हृदयद्रावक दृश्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले.
जरांगे यांनी धनंजय देशमुख यांचे सांत्वन केले, मात्र त्यांनाही अश्रू आवरणे कठीण झाले. यावेळी मस्साजोग गावचे (Massajog Village) काही ग्रामस्थही उपस्थित होते, आणि तेदेखील या घटनेने सुन्न झाले होते. धनंजय देशमुख यांच्या दुःखात संपूर्ण गाव सहभागी झाल्याचे चित्र दिसत होते.
चार्जशीटमधून समोर आलेलं भयानक राक्षसी कृत्यू आणि मारहाणीच्या घटनेतील फोटो पाहून संतोष देशमुख यांचे बंध धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले, तर या 8 आरोपींना पाठबळ मिळाल्यानेच त्यांची इथपर्यंत मजल केल्याचंही धनंजय यांनी म्हटलं.
बीड जिल्हा बंदची हाक
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ बीड जिल्हा (Beed District) बंदची हाक देण्यात आली आहे. एरवी सकाळी गजबजणाऱ्या बाजारपेठा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. या घटनेतील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सर्वत्र न्यायाची मागणी होत आहे.






