Manoj Jarange | ‘छातीवर गोळ्या लागल्या तरी…’; मनोज जरांगे रडले

On: January 20, 2024 10:59 AM
Manoj Jarange
---Advertisement---

जालना | मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची अंतरवली सराटी ते मुंबई पदयात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. बीडमधून हजारो मराठा बांधव अंतरवलीकडे रवाना झाले आहेत. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आज सकाळी 10 वाजता मुंबईकडे निघाले. यामुळे अंतरवली सराटीच्या मुख्य रस्त्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला.

आंदोलक जिथून बाहेर पडणार त्या ठिकाणी लावले बॅरिकेट लावण्यात आले आहेत. मुंबईला निघण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते भावूक झाले होते.

“माझ्या छातीवर गोळ्या पडल्या तरी मागे हटणार नाही”

मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. माझ्या छातीवर गोळ्या पडल्या तरी मागे हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली. यावेळी मनोज जरांगे यांच्या डोळ्यात पाणी आलं. आपली मुले मरत असताना सरकारला झोप कशी येतं? सरकार इतकं नालायक असू शकतं का?, असं जरांगे म्हणालेत.

Manoj Jarange | मनोज जरांगें रडले

आता छातीवर गोळ्या लागल्या तरी माघार नाही. समाजासाठी मी बलिदान देण्यास तयार आहे. उपोषण 26 जानेवारीपासून करायचं होतं. त्यापेक्षा आजच का करु नये? हा विचार मी केला आहे. याबाबत समाजाला विचारुन निर्णय घेणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

मराठा समाजाने सरकारला 7 महिने वेळ दिला. आता आरक्षण घेतल्या शिवाय राहणार नाही. मी असेल नसेल विचार जागे ठेवा. 26 तारखेला घरा घरातील मराठा समाजाने मुंबईला यावं, असं आवाहन जरांगेंनी केलं आहे.

मी गमिनी कावा करणार आहोत. सर्व काही आताच सांगणार नाही. आंदोलनाचे वेगवेगळे टप्पे आम्ही केले आहेत. मराठ्यांनो आता ही शेवटची लढाई आहे. आता घरी राहू नको. जे मुंबईला जातील त्याला सोडण्यास इतर मराठ्यांनी जावे, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Gold-Silver Price Today | सोनं महागलं; जाणून घ्या आजचे दर

T20 World Cup 2024 | हार्दिक पांड्या की शिवम दुबे?, वर्ल्डकपला कुणाला संधी, मोठी माहिती समोर

Team India चं टेंशन वाढवणारी बातमी समोर!

Rashmika Mandanna | ‘मी जोरात ओरडले, रडले…’; ‘या’ अभिनेत्याचं नाव घेत रश्मिका मंदानाने केला खुलासा

Ram Mandir | पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूने शेअर केले श्रीरामाचा फोटो, म्हणाला ‘माझा रामलल्ला…’

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now