ममता कुलकर्णीचं चाललंय काय?, परत एकदा बनली महामंडलेश्वर

On: February 14, 2025 3:15 PM
Mamta Kulkarni Returns as Mahamandaleshwar After 2-Day Resignation
---Advertisement---

Mamta Kulkarni | अभिनेत्री ममता कुलकर्णीने (Mamta Kulkarni) प्रयागराज येथील महाकुंभमध्ये संन्यास घेऊन अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. या निर्णयाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनण्याचा मानही तिला मिळाला.

राजीनामा आणि पुनर्नियुक्ती

काही वादानंतर ममताने (Mamta Kulkarni) महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला, परंतु अवघ्या दोनच दिवसांत तिने पुन्हा हे पद स्वीकारले. यानंतर तिने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण

श्रीयमाई ममता नंद गिरी (Shriyami Mamta Nand Giri) म्हणजेच ममता कुलकर्णीने इंस्टाग्रामवर 1 मिनिट 14 सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला.

त्यात ती म्हणते, “काही लोकांनी माझे गुरू स्वामी डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी (Swami Dr. Lakshmi Narayan Tripathi) यांच्यावर खोटे आरोप केले होते, ज्यामुळे मी भावूक होऊन किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला.” ती पुढे सांगते, “महामंडलेश्वर झाल्यावर गुरूंनी मला छत्री, काठी आणि पंखा भेट दिला होता. बाकीची रक्कम मी कम्युनिटी किचनला दान केली.”

“माझ्या गुरूंनी मला पुन्हा या पदावर बसवल्याबद्दल मी आभारी आहे. आता मी माझे जीवन किन्नर आखाडा आणि सनातन धर्माला समर्पित करेन,” असेही ममताने म्हटले.

Title : Mamta Kulkarni Returns as Mahamandaleshwar After 2-Day Resignation

 

Join WhatsApp Group

Join Now