मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर; सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन

On: January 26, 2025 11:22 AM
Malayalam film director Shafi passes away
---Advertisement---

Director Shafi Passes Away | मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि पटकथा लेखक शफी यांचे निधन झाले आहे. (Director Shafi Passes Away)

वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

शफी हे मल्याळम चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव होते. त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘चॉकलेट’, ‘माय बॉस’, ‘क्लीव्हर’ यांसारखे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. २००० च्या दशकात त्यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.

स्ट्रोकनंतर झालं निधन

काही मीडिया रिपोर्टनुसार, १६ जानेवारी रोजी शफी यांना स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, ९ दिवसांच्या उपचारानंतर २५ जानेवारी रोजी रात्री १२ वाजून २५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.

मल्याळम चित्रपटसृष्टीत पोकळी

शफी यांच्या निधनाने मल्याळम चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक अभिनेत्यांनी, दिग्दर्शकांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. शफी यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत.

Title : Malayalam film director Shafi passes away

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now