प्रसिद्ध अभिनेत्रीचं पंतप्रधान मोदींबद्दल मोठं वक्तव्य; थेट म्हणाली..

On: March 18, 2024 3:06 PM
PM Narendra Modi
---Advertisement---

Mahima Chaudhry | ‘परदेस’ फेम अभिनेत्री महिमा चौधरी हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये महिमाने निवडणूक आणि मोदी यांच्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.

देश प्रगतीच्या मार्गावर आहे. त्यामुळे कोणाला मत द्यायला हवं तुम्ही ठरवा, असं महिमा म्हणाली आहे. तिने मोदींचं भरभरून कौतुक केलं आहे. महिमा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

काय म्हणाली महिमा चौधरी?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची प्रतिष्ठा वाढवली आहे. सन्मान वाढवला आहे. पूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर काही घडलं की लोक अमेरिकेकडे बघायचे, पण आता प्रत्येकाची नजर भारताकडे असते. देश आर्थिकदृष्ट्या मजबूत होत आहे, देशातील तरुणांना मोदींकडून अपेक्षा आहेत.

इतर देशांमध्ये सतत काही न काही वाद सुरु आहे. शेजारच्या राष्ट्रांसोबत अनेक देशांचे वाद सुरु आहेत. पण भारतात शांतीचं वातावरण आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. या गोष्टींचं श्रेय फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी यांना जातं. त्यांना पाहिल्यानंतर लोकांना प्रेरणा मिळत आहे. ते कुठून आले आणि आता कुठे पोहोचले आहेत, असं अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhry) म्हणाली आहे.

पंतप्रधान मोदी 24 तास काम करतात

पुढे ती म्हणाली की, “पंतप्रधान मोदी देश चालवत आहेत. ते 24 तास काम करूनही थकत नाहीत. त्यांना किती अडचणी येत असतील. मी माझं घर चालवते तर थकून जाते. मी खूप प्रवास करते. अनेक ठिकाणी छोट्या-मोठ्या कार्यक्रमांसाठी जाते, असं कौतुक महिमाने केलं आहे. त्यामुळे सध्या महिमाच्या (Mahima Chaudhry) या वक्तव्याची चर्चा होत आहे.

महिमाने ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ योजनेबद्दल देखील वक्तव्य केलं. मोदी यांच्या एका नाऱ्याने लोकांना विचार करण्यासाठी प्रवृत्त केलं असल्याचं महिमा म्हणाली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिमाचं हे वक्तव्य आता चर्चेत आलं आहे.

News Title : Mahima Chaudhry praised PM Narendra Modi

महत्वाच्या बातम्या- 

RCB अखेर चॅम्पियन! विजेत्या संघावर कोट्यवधींचा वर्षाव; 13 पुरस्कारांचे वाटप, वाचा सविस्तर

“मोदींनी त्यांच्या पत्नीसोबत…”, प्रकाश आंबेडकरांचा मोदींना सल्ला

‘अब की बार भाजप तडीपार, हुकूमशाहीचा अंत करा’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

मोठी बातमी! शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला

बाळासाहेब ठाकरेंना राहुल गांधींकडून पहिल्यांदाच अभिवादन!

Join WhatsApp Group

Join Now