पुढील दोन दिवस महत्वाचे, राज्यात गारपीट आणि वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’!

On: April 14, 2025 7:36 AM
Rains Alert
---Advertisement---

Maharashtra Weather Update | राज्यातील अनेक भागांत अचानक हवामान बदलले असून, काही जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने (IMD) सोमवारीही पावसाचा इशारा दिला असून, पुढील दोन दिवस राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. (Maharashtra Weather Update)

राज्यभरात हवामानात बदल, काही ठिकाणी गारपीट

देशाच्या विविध भागांत उष्णतेची लाट कायम असली, तरी महाराष्ट्रात काही भागांत वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण तयार झालं असून, काही ठिकाणी गारपीटसह मुसळधार पाऊस पडत आहे. विशेष म्हणजे पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र संपुष्टात आले असले तरी, राजस्थानच्या पश्चिमेकडून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत एक नवीन कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे पावसाला अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे.

त्याचबरोबर, वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनही वाढल्याने वातावरणात ओलावा तयार झाला आहे. त्यामुळे काही भागांत हलकासा पाऊस पडतो आहे. यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, विदर्भातील काही जिल्ह्यांत अजूनही उष्णतेची लाट कायम आहे.

या जिल्ह्यांमध्ये वादळ व पावसाचा अलर्ट

हवामान खात्याने नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. सोमवारनंतर लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळमध्येही मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यावेळी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. कोकण, मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर येथे हलका ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

जळगाव, नांदेड, पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार सरी

रविवारी जळगाव, पिंपरी चिंचवड आणि नांदेडमध्ये (Nanded) अर्ध्या तासाच्या कालावधीत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यात काही भागांत गारपीटही झाली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं, दुपारनंतर पाऊस अचानक सुरू झाला. हवामान खात्याने आधीच याचा इशारा दिला होता आणि तो खरा ठरला. (Maharashtra Weather Update)

दरम्यान, राज्यात पावसाच्या आगमनामुळे काही अंशी तापमानात घट झाली असली, तरी उष्णतेची लाट पूर्णपणे ओसरलेली नाही. ढगाळ वातावरणामुळे तापमान थोडं कमी होतं, पण आकाश साफ झाल्यावर पुन्हा उष्णतेची तीव्रता वाढते. बहुतेक भागांत अजूनही तापमान ४० अंशांच्या आसपास आहे. मात्र, किनारी जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानात हळूहळू घट होत आहे.

Title : Maharashtra Weather Update Unseasonal Rains Alert

 

Join WhatsApp Group

Join Now