Maharashtra Weather Update | एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्रात उष्णतेने कहर केला असताना, हवामानात लवकरच मोठा बदल होणार आहे. हवामान खात्याने 13 आणि 14 एप्रिलसाठी अनेक भागांत पावसाचा आणि गारपिटीचा इशारा दिला असून, पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. (Maharashtra Weather Update)
चक्रीवादळाचा परिणाम, राज्यात पावसाची शक्यता
सध्या महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानाने उच्चांक गाठला असून, उष्णतेमुळे लोक त्रस्त झाले आहेत. आहे. हिटवेवचं संकट मागे पडलं असलं तरी कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात चक्रीवादळाच्या अप्रत्यक्ष परिणामांची चिन्हं दिसत आहेत. हवामान खात्यानुसार, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा तसेच गारपिटीचा इशारा जारी करण्यात आला आहे.
13 आणि 14 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीजांचा कडकडाट आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जळगावसारख्या उत्तर महाराष्ट्रातील भागातही पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. या बदलांमुळे कमाल तापमानात 3 ते 5अंशांनी घट होण्याची शक्यता असून, ढगाळ हवामानामुळे दिवसभराच्या तापमानात 3 अंश वाढही नोंदवली जाऊ शकते.
विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीचा अलर्ट जारी
विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांत हवामान खात्याने गारपिटीचा विशेष इशारा दिला आहे. नांदेड, लातूर, धाराशिव (उस्मानाबाद), चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, आणि यवतमाळ या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांत अचानक हवामान बदल होऊन शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान होऊ शकते.
विशेषतः शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचं संरक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. आगामी काही दिवसांत हवामानाचा कल लक्षात घेता, शहरी व ग्रामीण भागांतील नागरिकांनीही आवश्यक काळजी घेणं गरजेचं आहे.
English Title: Maharashtra Weather Update Hailstorm Warning in Vidarbha






