Maharashtra Weather | राज्यात सध्या तापमानाने उच्चांक गाठला असतानाही, हवामान खात्याने काही भागांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येत्या काही दिवसांत अवकाळी पावसाचा सामना करावा लागू शकतो. हवामान खात्याने या भागांसाठी हाय अलर्ट आणि यलो अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Weather)
विदर्भात पावसाचा हायअलर्ट
महाराष्ट्रात उन्हाचा कहर वाढला असून, नागरिक वाढत्या उष्णतेमुळे त्रस्त झाले आहेत. विदर्भात काही जिल्ह्यांना पावसाचा हायअलर्ट दिला गेला आहे. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना (Yavatmal, Chandrapur, Gadchiroli) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट लागू केला आहे. मराठवाड्यात जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये (Jalna, Parbhani, Beed, Hingoli) उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे, तर नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या (IMD Forecast) अंदाजानुसार, महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, मध्यप्रदेशसह २४ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आसाम, बिहार आणि पश्चिम बंगाल भागातही चक्रवातीय स्थिती सक्रिय झाली आहे, त्यामुळे या हवामान बदलाचा महाराष्ट्रातही परिणाम दिसून येणार आहे. रविवार, २७ एप्रिलपासून विदर्भात अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील हवामान अंदाज
हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, 26 एप्रिलनंतर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्याशा पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये (Nanded, Latur, Dharashiv) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच इतर जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा अंदाज आहे. पुढील चार दिवसांत मराठवाड्यात कमाल तापमानात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सियसने वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर तापमानात १ ते २ अंश सेल्सियसने घसरण होईल. किमान तापमानात मात्र फारसा फरक जाणवणार नाही,
Title: Maharashtra Weather Rain Alert Issued for Vidarbha and Marathwada






