Maharashtra Weather | राज्यात उन्हाच्या झळा वाढत असतानाच आता हवामान विभागाने (IMD) मोठा इशारा दिला आहे. महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट ओढावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 48 तास हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून, मुसळधार पावसाचा धोका असल्याचे IMDने स्पष्ट केले आहे. (Maharashtra Weather)
वातावरणात बदल
हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यात सध्या सायक्लोनिक सर्क्युलेशनसारखी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे वातावरणात मोठा बदल जाणवू लागला आहे. दक्षिणेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील हवामानात अस्थिरता निर्माण झाली आहे.
29 व 30 मार्चला कोकणात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांमध्ये वीजा चमकण्याचीही शक्यता आहे.
दुसरीकडे मुंबई, ठाणे, पुणे आणि नवी मुंबईमध्ये ढगाळ वातावरण राहील, असं हवामान विभागाने सांगितलं आहे.
शेतकऱ्यांसाठी पुन्हा धोक्याची घंटा
हा अचानक होणारा पाऊस शेतकऱ्यांच्या फळबागा, भाजीपाला आणि उरलेल्या पिकांवर फटका देऊ शकतो. विशेषतः आंबा, काजू, द्राक्ष, संत्री अशा पिकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
या हवामान बदलामुळे राज्याच्या काही भागांतील तापमानात घसरण तर काही ठिकाणी उकाड्यात वाढ होऊ शकते. शेतकऱ्यांनी याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केलं आहे.
Title : Maharashtra Weather IMD Warns Rain in Next 48 Hours






