उद्या अवकाळी पाऊस धो-धो कोसळणार; राज्यातील 22 जिल्ह्यांवर पावसाचं सावट, हवामान विभागाचा मोठा इशारा

On: April 1, 2026 6:01 PM
Weather Update
---Advertisement---

Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे संकट कायम असून गुरुवार (2 एप्रिल 2026) हा दिवस हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. India Meteorological Department ने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस, वीजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील तब्बल 31 जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव राहणार असून त्यापैकी 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर 22 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट :

हवामान विभागाच्या अंदाजानुसार गुरुवारी काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे.

या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, वीजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Unseasonal Rain Maharashtra)

Maharashtra Weather Alert | 22 जिल्ह्यांना यलो अलर्ट :

राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यात ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे घाट परिसर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.

या भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता :

हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील दोन दिवसांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होऊ शकते. त्यानंतर पुन्हा तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याची शक्यता आहे.

तर किमान तापमानात पुढील पाच दिवसांत फारसा बदल होणार नसल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (IMD Rain Forecast)

विजेपासून सावध राहण्याचे आवाहन :

मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. वीज चमकत असताना झाडाखाली, मोकळ्या शेतात किंवा पाण्याजवळ उभे राहणे टाळावे. तसेच लोखंडी वस्तूंपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या सूचनांनुसार विजांचा आवाज ऐकू येताच सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. यामुळे संभाव्य अपघात टाळता येऊ शकतात.

News Title : Maharashtra Weather Alert: Orange Warning For 9 Districts, Yellow Alert For 22 As Unseasonal Rain Likely Tomorrow 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now