पहलगाम पीडितांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा मोठा निर्णय

On: April 29, 2025 4:20 PM
Maharashtra
---Advertisement---

Devendra Fadnavis | राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेत (Crop Insurance Scheme) बदल करून सुधारित योजना लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने (State Cabinet) घेतला आहे. यासोबतच, पहलगाम (Pahalgam) हल्ल्यातील पीडित कुटुंबांना ५० लाखांची मदत आणि शासकीय नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. मंत्रिमंडळाने ईव्ही (EV) आणि जहाज बांधणी (Ship Building) उद्योगासाठीही नवीन धोरणे मंजूर केली.

पीक विमा योजनेत बदल का?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती देताना सांगितले की, पूर्वीच्या एक रुपयात पीक विमा योजनेत अनेक त्रुटी आणि घोटाळे निदर्शनास आले होते. लाखो बोगस अर्ज दाखल झाले, ज्यामुळे हजारो कोटींचा निधी वाया जात होता. गरजू शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचत नव्हता.

हे टाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने फायदा व्हावा, यासाठी आता केंद्र सरकारच्या अनिवार्य जोखीम बाबींवर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यात येणार आहे. या नवीन योजनेत विमा कंपन्यांऐवजी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल. तसेच, शेती क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी स्वतंत्र योजनाही मंजूर करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis | पहलगाम पीडितांना मोठा आधार

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील (Maharashtra) बांधवांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. याशिवाय, पीडित कुटुंबांच्या मुलांच्या शिक्षणाची आणि रोजगाराची जबाबदारी सरकार घेणार असून, जगदाळे कुटुंबातील एका मुलीला मुख्यमंत्र्यांच्या विशेषाधिकारात शासकीय नोकरी देण्याचा निर्णयही घेण्यात आला.

या व्यतिरिक्त, राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन धोरण मंजूर करण्यात आले असून, काही रस्त्यांवर ईव्ही प्रवासी वाहनांना टोलमाफी दिली जाणार आहे. तसेच, रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जहाज तोडणी आणि जहाज बांधणी उद्योगासाठीही नवीन धोरण मंजूर करण्यात आले आहे. सुधारित पीक विमा योजनेचा तपशील लवकरच जाहीर केला जाईल.

Maharashtra Revises Crop Insurance, Aids Pahalgam Victims

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now