Maharashtra politics| राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार Sunil Anna Shelke यांनी काही नेत्यांवर गंभीर आरोप करत मोठे विधान केले आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा जातीयवादाचा मुद्दा चर्चेत आला आहे. विधानसभेत त्यांनी म्हटलं की, “दादांच्या पश्चात काही लोकांनी जाणूनबुजून जातीयवादाचे राजकारण सुरू केले आहे.” भुजबळ, पटेल, तटकरेंना टार्गेट करुन जातीयवाद केल्या जात असल्याचं सुनील अण्णांनी म्हटलं.
अजित दादा गेल्यानंतर त्यांच्या पश्चात ज्यांनी खरी पवार कुटुंबाना साथ दिली छगन भुजबळ असतील आणि Sunil Tatkare त्याच नेत्यांना लक्ष्य करून जातीयवाद करुन राजकीय वातावरण तापवले जात असल्याचा आरोप सुनील अण्णांनी केला.
टार्गेट करुन जातीयवादाचं राजकारण
शेळके म्हणाले की महाराष्ट्राची राजकीय परंपरा ही सर्व समाजांना सोबत घेऊन जाण्याची राहिली आहे. मात्र काही जण वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी समाजांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारचे राजकारण राज्यासाठी धोकादायक ठरू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी पुढे सांगितले की राज्यात विकास, रोजगार आणि शेतकरी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणे गरजेचे आहे. परंतु काही लोक मुद्दाम वेगवेगळ्या समाजांना भिडवून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे समाजात तणाव निर्माण होऊ शकतो.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुनील शेळके यांनी गुरुवारी विधानसभेत बोलताना अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या. अपघाताच्या घटनेबाबत पोलीस ठाण्यात तक्रार का घेतली जात नाही, ऐनवेळी विमानाचा वैमानिक का बदलण्यात आला. विमानाला टेक-ऑफ घेण्यात वेळ का लागला, बारामतीत दृश्यमानता कमी असताना विमान उतरविण्याचा प्रयत्न का झाला, अशा अनेक शंका उपस्थित होत असून त्यांनी मुख्यमंत्र्यांना राज्यातील जनतेला अपघातामागचे सत्य सांगण्याची मागणी केली.






