Maharashtra politics | महायुती सरका आता भाजपच्या एका मंत्र्यावर अत्यंत गंभीर आरोप झाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राऊतांनी दावा केला आहे की, गोरे यांनी एका महिलेला नग्न फोटो पाठवले आणि तिचा छळ केला. (Maharashtra politics)
‘या’ नेत्यावर महिलेचे गंभीर आरोप
काही मीडिया रिपोर्टनुसार, जयकुमार गोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते (Hambirrao Mohite) यांच्या कुटुंबातील एका महिलेसोबत गैरवर्तन केले. त्या महिलेला सतत त्रास दिला जात असल्याचा आरोपही आहे. विशेष म्हणजे, या महिलेनं यापूर्वी गोरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
संजय राऊत यांनी देखील या प्रकरणी मोठा दावा केला आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांची नव्याने तपासणी करावी. धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागतो, पण भाजपच्या मंत्र्यांवर कारवाई केली जात नाही. जयकुमार गोरे यांनी एका महिलेचा छळ केला, तिला नग्न फोटो पाठवले, आणि आता ती महिला विधानभवनासमोर उपोषणाला बसणार आहे.”, असं राऊत यांनी सांगितलं.
नेमकं प्रकरण काय?
काही मीडिया रिपोर्टनुसार, महिलेने याबाबत तक्रार केली असून जयकुमार गोरे यांनी 2016 पासून तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. तक्रार केल्यानंतरही त्यांना अटक झाली नव्हती.
अखेर, सातारा जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आणि त्यांना 10 दिवस तुरुंगात राहावे लागले होते. विशेष म्हणजे, त्यानंतर त्यांनी लेखी माफी मागितली होती, पण तरीही महिलेला पुन्हा त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. (Maharashtra politics)






