Maharashtra Politics | भाजप नेत्या नवनीत राणा या अमरावती येथे लोकसभेच्या निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या. मात्र, त्यांचा इथे दारुण पराभव झाला. अशात अमरावती येथे महायुतीची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी आपली नाराजी जाहीर बोलून दाखवली आहे. यावेळी त्यांनी माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना देखील टार्गेट केलं आहे. (Maharashtra Politics)
राज्यपाल पदाच्या नियुक्तीवरुन महायुतीत चांगलीच खडाजंगी रंगली असताना आता शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ (Abhijeet Adsul) यांनीदेखील नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. नवनीत राणा यांना आवरा अथवा महायुतीतून बाहेर काढा, असा इशाराच त्यांनी दिला आहे. यामुळे अमरावतीमध्ये सध्या याची राजकारण चांगलंच तापलं आहे.
राणा दाम्पत्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडत आहे. आमचा स्वाभिमान दुखावला तर आम्हीही शिवसैनिक आहोत हे लक्षात ठेवावे, असं अभिजीत अडसूळ म्हणाले आहेत. आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सांगण्यावरून खुपवेळा माघार घेतली आहे, तरी राज्यपाल पद आनंदराव आडसूळ यांना का नाही?, असा (Maharashtra Politics)सवाल देखील अभिजीत अडसूळ यांनी उपस्थित केला आहे.
“राज्यपाल पद आनंदराव आडसूळ यांना का नाही?”
“अमित शाह यांनी स्वतः मार्च महिन्यात आनंदराव अडसूळ यांना राज्यपाल करणार, असा शब्द दिला होता. मग या यादीमध्ये आनंदराव अडसूळ यांचे नाव का नाही? महायुतीत भाजपकडून आमच्यावर अन्याय झाला.”, असा आरोप अभिजीत अडसूळ यांनी केला आहे.
तसंच भाजपने दिलेला शब्द पाळायला हवा. आम्ही राज्यपाल पदासाठी आजही थांबायला तयार आहोत. मात्र शिवसेनेच्या नेत्यांचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी भूमिकाच अडसूळ यांनी बोलून दाखवली आहे. यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढणार असल्याचं बोललं जातंय.(Maharashtra Politics)
“रवी राणांमुळेच बच्चू कडू महायुतीतून..”
पुढे त्यांनी रवी राणा यांच्यावर देखील निशाणा साधला. रवी राणा हे कायम वाचाळपणे बोलतात. राणा यांनीच त्यांच्या पत्नीचा घात करून त्यांना पाडलं, असा खळबळजनक दावाच अभिजीत अडसूळ यांनी केलाय. खोटी प्रमाणपत्र बनवून रवी राणा यांनी जनतेचा विश्वासघात केलाय. त्यामुळे जनतेनेही त्यांना जागा दाखवली, असंही ते म्हणाले आहेत. बच्चू कडू हे रवी राणांमुळे महायुतीतून दूर गेलेत. राणांना महायुतीतून बाहेर काढा, अन्यथा आम्ही महायुतीत रहायचं का नाही हे तरी सांगा, असा संतप्त सवाल अभिजीत अडसूळ यांनी उपस्थित केला आहे.(Maharashtra Politics)
News Title – Maharashtra Politics abhijeet adsul warning to mahayuti
महत्त्वाच्या बातम्या-
IRCTC चं श्रावण स्पेशल टुर पॅकेज; ‘या’ तीर्थक्षेत्रांना स्वस्तात भेट देण्याची सुवर्णसंधी
म्हाडा लॉटरीसाठी अशाप्रकारे करा अर्ज; घरांची किंमत किती असेल?
मोठी बातमी! विनेश फोगाटची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
वजनामुळे विनेश फोगाट ठरली अपात्र, जाणून घ्या काय आहे नियम? :
विनेश फोगाट विरोधात कारस्थान?, कुटुंबाकडून फेडरेशनवर गंभीर आरोप






