राज्यात बेरोजगारीची धक्कादायक आकडेवारी समोर; सरकारी पोर्टलवर ‘इतक्या’ लाख जणांची नोंदणी

On: January 28, 2025 9:20 AM
Pune IT Employee
---Advertisement---

Unemployment l मुंबईत (Mumbai) आयटी (IT) कंपन्यांमध्ये नोकरीसाठी लागलेल्या लांबच लांब रांगांचे दृश्य ताजे असतानाच, महाराष्ट्रातून (Maharashtra) एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. बेरोजगार (Unemployed) तरुणांनी मोठ्या प्रमाणात सरकारी नोकरीच्या पोर्टलवर (Government Job Portal) नोंदणी केली असून, ही संख्या तब्बल २४.५१ लाखांवर पोहोचली आहे.

केंद्र सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाच्या (Ministry of Labour and Employment) राष्ट्रीय करिअर सेवा (National Career Service) या पोर्टलवर नोकरीसाठी अर्ज (Job Application) केलेल्यांची ही आकडेवारी आहे. विशेष म्हणजे, नंदुरबार (Nandurbar), जळगाव (Jalgaon), छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), यवतमाळ (Yavatmal), बुलढाणा (Buldhana), नागपूर (Nagpur), नाशिक (Nashik), नांदेड (Nanded) आणि अमरावती (Amravati) या जिल्ह्यांतील नोकरीसाठी नोंदणी केलेल्यांची संख्या १ लाखापेक्षा अधिक आहे.

आयटी क्षेत्रात नोकरीसाठी मोठी चढाओढ :

एकीकडे, एआयमुळे (AI) आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांवर गदा येत असल्याची ओरड होत असताना, दुसरीकडे महाराष्ट्रातील दीड लाखांहून अधिक जणांनी याच क्षेत्रात नोकरीसाठी नोंदणी केल्याचे दिसून येत आहे. ही आकडेवारी, आयटी क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी असलेल्या तीव्र स्पर्धेचे द्योतक आहे.

एप्रिल ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत, देशात २ कोटी ३९ लाख लोकांनी रोजगारासाठी नोंदणी केल्याचे सरकारी पोर्टलवर दिसते. त्यात, महाराष्ट्राचा वाटा १९.०४ लाखांचा होता. डिसेंबरपर्यंत, महाराष्ट्रातील ही संख्या २४.५१ लाखांवर पोहोचली. त्यातही, सर्वाधिक नोंदणी एकट्या ऑक्टोबर महिन्यात झाली आहे.

Unemployment l शैक्षणिक पार्श्वभूमी आणि रोजगार मेळावे :

या साडे चोवीस लाख अर्जदारांमध्ये, ७ लाख ७७ हजार जण हे इयत्ता बारावी किंवा त्याहून अधिक शिक्षण घेतलेले आहेत. २ लाखांहून अधिक जणांनी पदवी (Degree) तर ३८ हजार जणांनी पदव्युत्तर शिक्षण (Post Graduation) पूर्ण केले आहे. राज्यात एप्रिल ते नोव्हेंबर या काळात १ हजार १३ रोजगार मेळावे घेण्यात आले.

जिल्हानिहाय आकडेवारी चिंताजनक :

महाराष्ट्रातील जिल्हानिहाय आकडेवारीवर नजर टाकल्यास, परिस्थिती चिंताजनक असल्याचे दिसते. काही जिल्ह्यांमध्ये ही संख्या लाखांच्या घरात आहे.

News Title : Maharashtra-Job-Seekers-Registration-Government-Portal-Unemployment

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now