Mahakumbh 2025 | प्रयागराजमध्ये (Prayagraj) महाकुंभ मेळावा (Mahakumbh 2025) सुरू असल्याने देशभरात भक्तीमय वातावरण आहे. महाकुंभाच्या काळात पवित्र स्नान करण्यासाठी देशभरातून लोक प्रयागराजमध्ये येत आहेत. तब्बल 144 वर्षांनंतर येणारा हा महाकुंभ मेळावा असल्यामुळे प्रयागराजमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. रेल्वे आणि बसमध्ये प्रचंड गर्दी असून खासगी वाहनांमुळे वाहतूक कोंडी (Traffic Jam) होत आहे. मात्र, तरीही भाविक प्रयागराजला येत आहेत.
वृद्धाचा अजब दावा
दरम्यान, एका वृद्ध व्यक्तीने दावा केला आहे की, जेव्हा ते स्नानासाठी गंगेत (Ganga River) उतरले, तेव्हा त्यांच्यासोबत एक विचित्र घटना घडली. सोशल मीडियावर (Social Media) या व्यक्तीने हा दावा केला आहे. जेव्हा ते स्नानासाठी गंगेत उतरले, तेव्हा त्यांच्या हाताला एक वस्तू लागली. त्यांना एक कासव (Turtle) मिळाले, ज्याच्या अंगावर इंग्रजी अक्षरे (English Alphabets) लिहिलेली होती. त्यांनी ते कासव घरी आणले असून, आता ते पाहण्यासाठी लोक त्यांच्या घरी गर्दी करत असल्याचे या वृद्धाने म्हटले आहे.
कासवाच्या अंगावर काय लिहिले होते?
या वृद्ध व्यक्तीने दावा केला आहे की, काही दिवसांपूर्वी ते प्रयागराजला गेले होते. स्नान करताना त्यांना पायाजवळ काहीतरी जाणवले. पाण्यात हात घालून पाहिले असता, त्यांच्या हाताला एक कासव लागले. या कासवाच्या अंगावर इंग्रजी मुळाक्षरे ‘एबीसीडी’ (‘ABCD’) लिहिलेली होती, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी ते कासव बाहेर काढून घरी आणले. ((Mahakumbh 2025))
अंधश्रद्धा की सत्य?
एकीकडे या वृद्ध व्यक्तीने कासवाबाबत दावा केला आहे, तर दुसरीकडे काही लोकांनी हा दावा अंधश्रद्धा (Superstition) असल्याचे म्हटले आहे. कासवाच्या अंगावर पिवळ्या रंगाच्या खुणा दिसत आहेत, पण त्या एका विशिष्ट प्रकारच्या नक्षीसारख्या (Pattern) आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. हा नमुना अक्षरांसारखा दिसत असल्याचा दावा या लोकांनी केला आहे. मात्र, हे कासव पाहण्यासाठी आता या वृद्धाच्या घरी लोकांची गर्दी होत आहे. ((Mahakumbh 2025))
Title : Mahakumbh 2025 Man Claims to Find Turtle with English Alphabets






