महादेव मुंडे खून प्रकरणी मोठी अपडेट समोर; कुटुंबियांचा पोलिसांना 10 दिवसांचा अल्टिमेटम

On: February 12, 2025 10:49 AM
Mahadev Munde Murder Case
---Advertisement---

Mahadev Munde Murder Case | बीड (Beed) शहरातील परळी (Parali) येथील महादेव मुंडे (Mahadev Munde) यांच्या खून प्रकरणाला १६ महिने उलटूनही तपास लागलेला नाही. त्यामुळे त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे (Dnyaneshwari Munde) आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी पोलिसांना आरोपींना पकडण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे, अन्यथा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. (Mahadev Munde Murder Case)

तपास न लागल्याने कुटुंबियांचा संताप

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. त्यापूर्वी परळीत महादेव मुंडे यांचा खून झाल्याने खळबळ उडाली होती. मुंडे यांचा खून करून मृतदेह तहसील कार्यालयाच्या आवारात टाकण्यात आला होता. या घटनेला आता १६ महिने उलटले, तरीही तपास लागलेला नाही.

ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मंगळवारी आपल्या मुलांसह पोलिस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. त्यांनी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत (Navneet Kanvat) कार्यालयात नसल्याने तेथेच ठिय्या मांडला. पुढील १० दिवसांत या गुन्ह्याचा तपास झाला नाही, तर थेट पोलिस अधीक्षक कार्यालयातच उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह

सुरुवातीला या प्रकरणाचा तपास परळी पोलिसांनी केला, पण त्यांच्यावर विरोधकांनी गंभीर आरोप केले. त्यानंतर हे प्रकरण अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले (Anil Chormale) यांच्याकडे सोपवण्यात आले. परंतु, त्यांनीही काहीच केले नाही, असा आरोप ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला आहे. (Mahadev Munde Murder Case)

मंगळवारी पोलिस अधीक्षक काँवत हे बैठकीसाठी परळीलाच गेल्याचे सांगण्यात आले. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात अविनाश बारगळ यांची बदली करून त्यांच्या जागी पोलिस अधीक्षक म्हणून नवनीत काँवत यांची नियुक्ती केली. असे असले तरी, जिल्ह्यातील गुन्हेगारी थांबत नसल्याचे चित्र आहे. परळी तालुक्यातील सिरसाळा येथे भर चौकात वाहने जाळण्यासह सत्तुरने वार केल्याची घटना घडली. त्यानंतर माजलगावातही स्मशानभूमीत तोडफोड करून वाहने जाळण्यात आली.

Title : Mahadev Munde Murder Case 10-Day Ultimatum to Police

 

Join WhatsApp Group

Join Now