“…तर मी राजकारणातून संन्यास घेईल”, महादेव जानकरांची मोठी घोषणा

On: April 24, 2024 8:16 PM
Mahadev Jankar
---Advertisement---

Mahadev Jankar | महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. पहिल्या मतदानाचा टप्पा पार पडल्यानंतर दुसऱ्या मतदानाचा टप्पा हा 26 एप्रिलला पार पडणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात दुसऱ्या मतदानाचा टप्पा पार पडणार आहे. परभणीमध्ये रासपचे उमेदवार महादेव जानकर (Mahadev Jankar) विरूद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार संजय बंडू जाधव यांच्यात लढत होणार आहे. यापार्श्वभूमीवर मंगळवारी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या सभेला संबोधित केलं होतं. त्यावेळी भर पावसात भाषण करत असताना विरोधकाचे डिपॉझिट जप्त करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता रासपचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलंच सुनावलं आहे.

दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचार सभेसाठी आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जिकडे तिकडे सभांचा तडाखा लावला जात आहे. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी परभणी येथे सभेला संबोधित करत असताना महादेव जानकर (Mahadev Jankar) यांचं डिपॉझिट जप्त करण्याबाबत वक्तव्य केलं होतं. त्यावर आता महादेव जानकर यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला आणि माझ्यासारखा बहुजन समाजातील मुलगा खासदार झालेला पाहावत नाही का?, असा सवाल करत त्यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलंय. 26 एप्रिल नंतर मी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात रान पेटवणार असल्याचा इशारा दिला.

“…तर मी संन्यास घेईल”

गेल्या काही दिवसांपासून महादेव जानकर (Mahadev Jankar) हे परभणी मतदारसंघात जात मतदारांच्या गाठीभेटी घेताना दिसत आहेत. मी आतापर्यंत 90 टक्के मतदारसंघ फिरलो आहे. मला चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत. लोकं माझ्या पाठीशी आहेत. माझी लिड ही साडेचार लाखांची राहिल. मी जर निवडून आलो नाहीतर मी संन्यास घेईल, अशी घोषणा महादेव जानकर यांनी केलीये.

शेतकऱ्याचं पोरगं मुख्यमंत्री झालेलं देखवत नाही. माझ्यासारखा बहुजन सामाजातील पोरगं खासदार झालेलं उद्धव ठाकरे आणि आदित्यला देखवत नाही का?, असा सवाल महादेव जानकर यांनी केला. माझ्यावर दोघांकडून अशा प्रकारची टीका होईल अशी अपेक्षा नव्हती. यामुळे मी आता 26 एप्रिलनंतर ज्या भागात महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. तिथे मी रान पेटवणार असल्याचं महादेव जानकर म्हणालेत.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

“तुम्ही प्रेमाने आला होता तेव्हा आम्ही मिठी दिली होती. मात्र आता माझी वाघनखे बाहेर निघाली आहेत. असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी केला. आपल्याला अबकी बार भाजप तडीपार करायची आहे. हे आपला महाराष्ट्र पळवून नेत आहेत. उद्योगधंदे पळवत आहेत. यामुळे बंडू जाधव यांना मताधिक्याने निवडून द्या आणि समोरच्याचं डिपॉझिट जप्त करा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

News Title – Mahadev Jankar Big Statement In Parbhani Loksabha

महत्त्वाच्या बातम्या

शरद पवारांचा राज ठाकरे पॅटर्न, भरसभेत लावला मोदींचा ‘तो’ व्हिडीओ

“कोण पृथ्वीराज चव्हाण?, मी माझ्या स्टेटसच्या व्यक्तीसोबत बसतो”

सर्वात मोठी बातमी! नितीन गडकरींना भाषणादरम्यान भोवळ

भाड्याचे कपडे घेऊन बॉलीवुड स्टार करतात स्टायलिंग; प्रसिद्ध अभिनेत्याने केली पोलखोल

‘बायको,मुलीवरुन बोलाल तर शोधून काढून ..’; महेश मांजरेकरांचा ट्रोलर्सला सज्जड दम

Join WhatsApp Group

Join Now